‘आत्मकल्याणापेक्षा लोककल्याण अधिक श्रेयस्कर असते. शुद्ध सत्त्वगुणावर विराजमान झाल्याखेरीज खर्या लोककल्याणाची आस मनात निर्माण होत नाही. अशा लोककल्याणाकरता केलेली कुठलीही कृती वरपांगी हिंसक दिसत असली, तरी ती अहिंसकच असते. हिंसा अहंसेचा निर्णय कृतीवरून नव्हे, तर वृत्तीवरूनच घ्यावा लागतो; कारण सात्त्विकतेतच अहिंसा दडलेली असते. तीच ईश्वरप्रवण करते.
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)