Muslim Women Attack : मुसलमान महिलांकडून पोलीस ठाण्यातच महिला पोलीस अधिकारी आणि अन्य पोलीस यांना मारहाण !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील घटना

बेंगळुरू (कर्नाटक) – पैशांच्या चौकशीसाठी तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलांच्या एका गटाकडून महिला पोलीस उपनिरीक्षक आणि इतर पोलीस यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याची घटना येथील ज्ञानभारती पोलीस ठाण्यात घडली. या घटनेच्या संदर्भात ३ महिलांना अटक करण्यात आली आहे. आयेशा ताज, फौजिया आणि अर्बिन ताज अशी त्यांची नावे आहेत.

पैशांच्या संदर्भात या महिला आणि शोएब यांच्यात वाद झाला होता. या संदर्भात त्या नासीर याच्यासह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आल्या होत्या; परंतु नंतर तक्रार न नोंदवता पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. यावर पोलीस उपनिरीक्षक सुरेखा म्हणाल्या, ‘तक्रार करायची असेल तर करा, अन्यथा निघून जा.’ यानंतर त्यांच्या वाद झाला आणि त्यांनी सुरेखा यांनाच मारहाण केली, तसेच अन्य पोलिसांवरही हात उचलला. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी स्वतःचे नाव आणि पत्ता चुकीचा सांगितला. त्यांच्याजवळील आधारकार्ड तपासल्यावर खरे नाव समजले.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांध मुसलमानांचे फावले असून ते सातत्याने कायदा हातात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहेत. काँग्रेसची सत्ता आल्यावर काय होते ?, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !