तुम्ही अनेकदा देवाच्या नावाचा महिमा ऐकलाच असेल. ‘राम’ नाम लिहिणार्यांनाही तुम्ही पाहिले असेल; मात्र ‘रामापेक्षा रामाचे नाव मोठे’, असे म्हटले गेले आहे. या नावाचा महिमा असा आहे की, केवळ हे नाव लिहिल्याने अनेकांना लाभ होऊ शकतो. राम नाम लिहिणार्यांनी सांगितले, ‘राम’ शब्द हा एका मंत्रासारखा आहे, जो लिहिल्याने स्वतःच्या आयुष्यात अनेक प्रकारचे पालट पहायला मिळतात.
१. राम नाम लिहून तुम्ही सदैव राम भक्तीमार्गाशी जोडलेले रहाता, तसेच हा मंत्र तुम्हाला मुक्ती प्रदान करतो.
२. राम नाम लिहिल्याने तुमचे शरीर आणि मन एकाच ठिकाणी एकाग्र रहाते, तसेच इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास साहाय्य होते.
३. या मंत्रातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट, म्हणजे नामामुळे मनात निर्माण होणारे चुकीचे विचार आणि इच्छा दूर होतात. मन प्रसन्न रहाते.
४. रामाचे नाव लिहितांना हृदयात उमटणार्या भावासह हा मंत्र कानात गुंजतो.
५. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वेळ असतो, तेव्हा त्या व्यक्तीचे मन सर्वाधिक भटकते. त्यामुळे अशा वेळी या मंत्राचा जप किंवा तो लिहिल्याने वाया गेलेल्या वेळेची बचत होण्यासह भक्तीमध्ये प्रगती होते.
– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे (साभार : ‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ फेसबुक)