प्रेमळ, अभ्यासू वृत्ती आणि तळमळीने सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुषमा लांडे !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात दायित्व घेऊन सेवा करणार्‍या कु. सुषमा लांडे यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. सुषमा लांडे

१. चांगली निरीक्षणक्षमता

‘कु. सुषमाला सर्व गोष्टींची चांगली पारख आहे. ती साधकांतील गुण अचूक हेरते.

२. अभ्यासू वृत्ती

अ. ती अन्नपूर्णाकक्षातील सेवांचे नियोजन करते. ती ‘साधक कोणत्या सेवा करू शकतात ?’, हे त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांना सेवा देते.

आ. ‘एखादा साधक एखादी सेवा किती वेळात करू शकतो ?’, याचा ती अभ्यास करते आणि त्यांना तेवढ्या वेळातच होणारी सेवा देते. त्यामुळे त्या साधकाचा उत्साह वाढतो.

इ. साधकांना सर्व सेवा शिकता येतील, या दृष्टीने ती साधकांच्या सेवेत सतत पालट करत असते.

३. प्रेमभाव

अ. ती सर्व साधकांना सांभाळून घेते.

आ. साधकांकडून चूक झाली, तर ती त्यांना प्रेमाने समजावून सांगते.

इ. तिचे बोलणे ऐकून साधकांना ताण न येता त्यांना तिचा आधार वाटतो.

४. सेवेची तळमळ

तिला अनेक व्याधी (पाठदुखी, कटीशूल, पित्तविकार) आहेत, तरीही तिची सेवा अखंड चालू असते.

५. कर्तेपणा स्वतःकडे न घेणे

आश्रमात सणाच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ केले जातात. तेव्हा ती स्वतः ते पदार्थ बनवते. त्याचा कर्तेपणा स्वतःकडे न घेता ती सांगते, ‘‘मी काहीच करत नाही. साधकच सर्वकाही करतात.’’

६. कृतज्ञताभाव

सुषमाला कुणी काही दिले, तर ती म्हणते, ‘‘मी काहीच करत नाही, तरीही देव माझ्यासाठी किती करतो !’’

– श्रीमती रत्नप्रभा बबन कदम, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.९.२०२२)