‘सगळे ईश्वरेच्छेने होते’, हे लक्षात घेतल्यावर नेहमी आनंदी रहाता येते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री. गिरिजय प्रभुदेसाई : परम पूज्य, एका सेवेच्या अंतर्गत माझी तीव्र अपेक्षा अशी झाली की, ‘एवढेच जण संस्थेच्या संपर्कात आले. त्या सेवेला आणखी प्रतिसाद मिळून अधिक जण संस्थेच्या संपर्कात यायला हवे होते.’

श्री. गिरिजय प्रभुदेसाई

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कोणत्याही गोष्टीत अपेक्षा ठेवायची नाही. ‘अपेक्षा करणे’, ही स्वेच्छा झाली. ‘स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा’, हे ठाऊक आहे ना ? सगळे ईश्वरेच्छेने होते ना ! कालमहिमा असतो. काळानुसार काय होणार आणि नाही होणार, ते आपण शिकत जायचे. पुढे आपल्याला कोणतीच इच्छा रहात नाही. ‘देवा, तू करशील, ते करशील’, अशी आपली विचारप्रक्रिया होते. मग आपण नेहमी आनंदी असतो.