Faiyaz Anjuman-e-Islam:आरोपी फैयाज याचा खटला कुणीही लढवू नये ! – ‘अंजुमन-ए-इस्लाम कमिटी’चे आवाहन

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील नेहा हिरेमठ हिच्या हत्येचे प्रकरण

हुब्बळ्ळी (कर्नाटक) –  काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिची फैयाज याने हत्या केल्यानंतर मुसलमान नेते हिरेमठ यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करत आहेत. या वेळी कमिटी’च्या सदस्यांनी ‘आरोपी फैयाज याचा खटला कुठल्याही अधिवक्त्याने लढवू नये, तसेच त्याला कठोर शिक्षा करावी. अशा प्रकारणात नवीन कायदा व्हावा’, असे हिरेमठ यांना सांगत ‘आम्ही तुमच्या समवेत आहोत’, अशा शब्दांत धीर देण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त काँग्रेसचे नेते अल्ताफ हळ्ळूर, पालिका सदस्य नजीर अहमद होन्याळ, आरिफ भद्रापूर, इलियास मनियार यांच्यासह अनेक नेत्यांनी हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

सौजन्य:The News Update

पोलिसांकडून अद्याप आरोपींना अटक केली जात नसल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा ! – निरंजन हिरेमठ यांची मागणी

नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, नेहाच्या हत्येच्या संदर्भात मी ८ जणांची नावे पोलिसांना दिली होती. त्यांनी अद्याप एकालाही पकडलेला नाही. जर ते आरोपींना अटक करू शकत नसतील, तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. येथील आयुक्त महिला आहेत, तरीही त्या मुलीच्या हत्येच्या घटनेकडे गांभीर्याने पहात नाहीत. आयुक्त दबावाखाली काम करत आहेत. माझा विश्‍वास आता उडाला आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यासाठी आयुक्तांचे स्थानांतर केले जावे, अशीही मागणी त्यांनी केली.