Siddaramaiah On Modi:पंतप्रधान मोदी यांना सुशिक्षित तरुणांनी ‘नालायक’ ठरवले आहे !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधान !

नरेंद्र मोदी व सिद्धरामय्या

कोलार (कर्नाटक) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युवकांना वर्षाला २ कोटी नोकर्‍या देऊ’, असे आश्‍वासन दिले होते; मात्र ते युवकांना भजी विकण्यास सांगत आहेत. एकीकडे पदवीनंतर नोकरी मिळण्याची आशा असते, तर दुसरीकडे मोदी तरुणांना भजी विकण्यास सांगत आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी नरेंद्र मोदी यांना नालायक ठरवले आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर येथे प्रचारसभेत बोलतांना केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, नालायक मोदी सत्तेत येण्याआधी पेट्रोल, डिझेल, गॅस, खते, धान्य आणि खाद्यतेल यांच्या किमती काय होत्या ? गेल्या १० वर्षांमध्ये ते काहीही न करता मते मागत आहेत. मोदी यांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात तुम्हाला केवळ खोटेपणा आणि फसवणूकच पदरात पडली आहे. दुसरीकडे काँग्रेसने दिलेले वचन पूर्ण केले असून प्रत्येक कुटुंबाला आता महिन्याला ४ ते ६ सहस्र रुपये मिळत आहेत.

संपादकीय भूमिका

काँग्रेसला वर्ष २०१४ पासून जनतेने सत्ताच्युत का केले आहे ? याचे उत्तर सिद्धरामय्या देतील का ?