६०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या माध्यमातून लाच स्वीकारल्याचे प्रकरण !
मुंबई – येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना त्यांच्या विरोधात प्रिवष्ट असलेल्या शेवटच्या प्रलंबित खटल्यात विशेष न्यायालयाने जामीन संमत केला. त्यामुळे राणा हे ४ वर्षांनी कारागृहातून बाहेर पडणार आहेत. अवंथा रियाल्टीशी संबंधित प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यात राणा यांना विशेष न्यायालयाने जामीन संमत केला.
दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (डी.एच्.एफ्.एल्.ने) राणा यांना त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या आस्थापनाला दिलेल्या ६०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या माध्यमातून लाच स्वीकारल्याच्या केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने गुन्हा नोंद केला होता. या प्रकणात ८ मार्च २०२० या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) राणा यांना अटक केली होती.