कर्तव्यतत्पर वीज कर्मचार्‍यांचा मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने सत्कार !

अमळनेर – शहरात नुकतीच वादळी वार्‍यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यात शहरासह अनेक गावांतील घरे, दुकाने, शेती उत्पादने आणि अनेक झाडे उन्मळून पडली, तसेच ताराही तुटल्याने मोठ्या प्रमाणावर हानी होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील १३२ के.व्ही. क्षमता असलेल्या वीज उपकेंद्रातील कर्मचार्‍यांनी कर्तव्यतत्परता दाखवत अतिशय अल्प कालावधीत शहरातील पुरवठा सुरळीत करून शहरवासियांचे जनजीवन पूर्वपदावर आणले. या कामगिरीची मंगळग्रह सेवा संस्थेने नोंद घेऊन संबंधित वीज उपकेंद्रातील कर्मचार्‍यांचा सत्कार केला. त्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांनी श्रीरामनवमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित पूजास्थळी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला. तसेच श्री मंगळग्रह देवतेचेही दर्शन घेतले.

‘मंगळ ग्रह सेवा संस्थे’ने आमचा केलेला सत्कार हा साक्षात् ईश्वरी आशीर्वाद आहे. येणार्‍या काळात लोकसेवेसाठी या सत्कार्याची ऊर्जा आम्हास उत्साह प्रदान करील’, असे राज्य वीज वितरण महामंडळाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता टी.एच्. नेमाडे म्हणाले.