Live In Relationship : (म्हणे) ‘लग्नाआधी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाच !’ – झीनत अमान, अभिनेत्री

(लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे विवाह न करता एकत्र रहाणे)

झीनत अमान, अभिनेत्री

मुंबई : आपल्या देशात अजूनही जी जोडपी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहातात, म्हणजेच लग्नाआधी एकत्र रहातात त्यांच्याकडे वाईट दृष्टीने पाहिले जाते; मात्र आजच्या तरुणांनी लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहिले पाहिजे, असे मत अभिनेत्री झीनत अमान यांनी व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या,

‘‘माझी दोन्ही मुले लिव्ह इनमध्ये राहिली आहेत. लव्ह-इन रिलेशनशिपमुळे जोडप्यांना मतभेदांना सामोरे जाता येते. लग्नाआधी ते एकत्र राहून छोटे-मोठे वाद मिटवायला शिकतात. त्यांच्यात समन्वय वाढतो. दोन व्यक्तींनी त्यांचे नाते विवाहात रूपांतरित करण्याआधी त्यांच्या नात्याची परीक्षा घेणे मला तर्कसंगत वाटते. जोडीदारासमवेत वेळ घालवतांना तुम्ही काही काळ स्वतःला सर्वोत्तम दाखवणे सोपे आहे; मात्र बराच काळ एकत्रित रहातांना तुम्ही छोटेमोठे प्रसंग हाताळू शकता का ? थोडक्यात तुम्ही एकमेकांना अनुरूप आहात का ?, हे त्यामुळे लक्षात येते.’’

संपादकीय भूमिका

  • हे असे सल्ले देण्यापेक्षा झीनत अमान यांनी स्वधर्मातील स्त्रियांवर अन्याय करणार्‍या बुरखा आणि इतर अन्याय्य प्रथांच्या विरोधात बोलावे !
  • अमेरिकेत आता कुटुंब पद्धतीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात अधोरेखित होत असतांना भारतात अशा अनैतिक प्रकारांना प्रोत्साहन देणार्‍यांना काय म्हणावे ?
  • लग्नाआधी लिव्ह इन’मध्ये राहून जमले नाही, तर असे किती वेळा ‘लिव्ह इन’मध्ये रहायचे ?