देश आणि धर्म यांच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीचे महत्त्व !

यू ट्यूबवरील चॅनेलच्या पत्रकार पूजा सिंह यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्माते मयांक जैन यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांच्या स्थितीविषयी संवाद साधला, तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. या संवादावर आधारित लेख येथे देत आहोत.

१. भारतावर राज्य करण्यासाठी जनतेचे भाजपला प्राधान्य

‘वर्ष १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रारंभ झाला, तेव्हा त्यांची मतपेढी अत्यल्प होती. त्या वेळी भारतात ‘गांधी काँग्रेस’, ‘सरदार काँग्रेस’, ‘बाळ गंगाधर टिळक काँग्रेस’ इत्यादी नावाने अनेक मतपेढ्या होत्या; परंतु स्वातंत्र्यानंतर नेहरूप्रणीत साम्यवादी डाव्या गटाची काँग्रेस गृहीत धरली जाऊन तिला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून प्राधान्य देण्यात आले. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ते सर्व जण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी झाले आणि याच पक्षाला त्यांचा तारणहार समजू लागले. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आणि सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना ब्रिटीश प्रसारमाध्यमे अन् म. गांधी यांनी कधीच ग्राह्य धरले नाही. त्यांनी देशाला राजकारणाच्या काळ्या छायेत ढकलले. वर्ष १९८४ मध्ये राजीव गांधी यांनी निवडणूक जिंकली, तेव्हा भाजपचे संसदेत केवळ २ खासदार होते. त्या काळात भाजपच्या दृष्टीने ती महत्त्वाची प्रगती होती. आज मोदी यांनी देशात सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यात केवळ भारतातील नव्हे, तर जगातील लोक भाजपमध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत. काँग्रेस पक्षातील अनेक लोक देशासाठी कार्य करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगले कार्य केले आहे. प्रश्न असा आहे की, प्रत्येक जण भाजपकडून काही अपेक्षा करत आहे. याप्रकारे भाजपने एक पक्ष म्हणून देशासाठी कार्य केले आहे आणि शहरी अन् ग्रामीण भागांचा विकास केला आहे.

भाजपच्या कार्याविषयी मुसलमान महिलाही समाधानी आहेत. भाजपने तीन तलाक (घटस्फोट) काढल्याने या महिला भाजपसाठी मतदान करतील आणि तुम्ही त्यांना कसे थांबवू शकता ? जर भाजप चांगले कार्य करत असेल, तर लोक त्यांना पाठिंबा देतील, हे उघड आहे. पंजाबमध्ये प्रामुख्याने काँग्रेससाठी मतपेढी होती; परंतु आता ती आम आदमी पक्षाच्या बाजूने आहे. शिखांनी हिंदु समाजामध्ये सहभागी होण्यासाठी भाजपने पाठिंबा दिला आहे आणि तेथील हिंदूंना खलिस्तान्यांकडून दिली जाणारी अमानुष वागणूक अन् केले जाणारे अत्याचार यांविषयी काही वक्तव्य केलेले नाही. त्यांनी पंजाबमधील मतपेढी मिळवण्यासाठी याविषयी बोलायला प्रारंभ केला पाहिजे.

२. हिंदूंचे धर्मांतर थांबवण्यासाठी दक्षिणेतील राज्ये आणि बंगाल यांमध्ये हिंदुत्वनिष्ठांची सत्ता आवश्यक !

अ. बंगालमध्ये हिंदु समाजाची दुःस्थिती : बंगालमधील हिंदु समाज पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून त्याला कोणाचाही पाठिंबा नाही. भविष्यात बंगालची स्थिती गुजरातप्रमाणे होईल, हा दिवस लांब नाही. बंगालमध्ये साम्यवादी गटाचे सरकार आहे. ममता बॅनर्जी यांनी डाव्या मुसलमानधार्जिण्या पक्षांच्या मतपेढीचा पाठींबा घेतला असून बंगालचे इस्लामीकरण करण्याची प्रक्रिया चालू आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. आता हळूहळू बंगालमधील जनता मोदींनी केलेला विकास पहात असून त्यांची मते भाजपच्या दिशेने वळत आहेत. तसेच मुसलमानधार्जिण्या साम्यवादी गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांकडून दाखवलेली अमानवता हेही एक लोक भाजपला जोडत असण्याचे एक कारण आहे. बंगालमधून भ्रष्टाचार अगदी मूळापर्यंत असल्याने पालट होण्यास थोडा विलंब लागेल.

आ. अन्य राज्यांमध्ये भाजपची स्थिती : त्रिपुरा हे याचे (जनतेमध्ये पालट होत असल्याचे) उत्तम उदाहरण आहे. त्रिपुरामध्ये साम्यवादी पक्षांची सत्ता होती. भाजपने त्यांचा पूर्णपणे पराभव केला आणि आता त्रिपुरा ही भाजपची मतपेढी आहे. भारताच्या दक्षिण भागात विशेषतः कर्नाटकमध्ये प्रत्येक प्रदेश हा भारतीय संस्कृतीला जोडलेला आहे. प्रत्येक ऐतिहासिक स्थळाचा रामायण आणि महाभारत यांच्याशी संबंध आहे. प्रत्येक गावामध्ये रामायण आणि महाभारत ही कथानके नाटक, गाणी किंवा संगीत सादर केले जाते. यातून भारतीय संस्कृती दिसून येते. कन्नड भाषा ही संस्कृतची पोटभाषा आहे. बंगालमध्ये साम्यवादी आणि काँग्रेस पक्ष यांचे मुसलमानधार्जिणे धोरण तीव्र असतांना भाजप त्याचे अस्तित्व दाखवून देईल; पण यासाठी थोडा वेळ लागेल.

इ. तमिळनाडूतील कानाकोपर्‍यात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी : भाजपचे तमिळनाडूतील प्रमुख नेते अण्णामलाई यांच्यामुळे तेथे क्रांती झाली आहे. तमिळनाडूमध्ये अनेक सुंदर मंदिरे आहेत आणि तेथील हिंदु पोंगल, गणेशपूजा इत्यादी उत्सव उत्साहाने साजरे करतात; परंतु तेथील अण्णा द्रमुक यांचे हिंदुविरोधी सरकार धर्मांतरावर लक्ष केंद्रीत केलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना पाठिंबा देत आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात इस्लामचा प्रचार होत आहे. ‘तमिळनाडूमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत’, असा प्रचार केला जात आहे. तेथे ‘भूमी जिहाद’, ‘लोकांचा जिहाद’, ‘कौशल्य जिहाद’ कार्यरत आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक ३० किलोमीटर अंतरावर एक मशीद आहे, अशी स्थिती आहे. तेथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. जरी तिथे मुसलमानांची लोकसंख्या ६ टक्के असली, तरी ती मोठ्या प्रमाणात असल्याचे भासवले जात आहे आणि हिंदू तशी समजूत करून घेत आहेत.

तमिळनाडूतील कानाकोपर्‍यात घुसखोरी होत असतांना अण्णामलाई यांनी हिंदूंमध्ये जागृती निर्माण केली असून त्यांचा प्रभाव वाढत आहे. आंध्रप्रदेशमध्ये स्थिती चांगली आहे आणि नवीन युतीमुळे हिंदूंचा लाभ झाला आहे. तेलंगाणामधील लोक एम्.आय.एम्.च्या ओवैसींच्या विरोधात असून तेथेही भाजप वाढत आहे.

३. अयोध्येतील रामलल्लाच्या (रामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठेमुळे हिंदूंमध्ये ऊर्जेचा संचार

श्रीरामलला

काही लोक ‘हिंदु धर्म हा भ्रम निर्माण करणारा आहे, हिंदूंच्या देवदेवता खोट्या आहेत, हिंदू अंधविश्वासावर ठेवतात’, असे म्हणत आपल्या धर्माची थट्टा करतात; परंतु अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हिंदूंना शक्ती प्राप्त झाली असून त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. ही नवीन निर्माण झालेली शक्ती, अभिमान आणि हिंदूंमध्ये झालेला आध्यात्मिक विकास यांमुळे हिंदुत्वाची चळवळ उभी रहात आहे. या आध्यात्मिकतेमुळे नवीन शक्ती प्राप्त झाली आहे. जगभर हिंदूंची थट्टा केली जात होती; परंतु आज लोक भारतीय अभियंते, ‘मेक इन इंडिया’ आणि जगातील तरुण भारतीय उद्योजक यांविषयी बोलत आहेत. जे लोक ‘मारा’, ‘मारा’ असे म्हणत होते, ते आज ‘राम’ ‘राम’ असे म्हणत आहेत. हा  केवळ प्रारंभ आहे. भारत हा आता जगाला विचारसरणी देणारा देश बनला आहे. देशात सकारात्मक उर्जा कार्यरत झाली असून येणार्‍या काळात भारतही महासत्ता होणार आहे. याचे जनक मोदी आणि योगी आहेत, जे निःस्वार्थी असून देशावर प्रेम करणारे आहेत. हे सर्व लक्षात घेता येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० हून अधिक जागा निश्चितपणे मिळणार आहेत, असे मला वाटते.’

– मयांक जैन, ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्माते. (१.३.२०२४)

संपादकीय भूमिका 

तमिळनाडूसह देशभरात होत असलेली घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया’ राबवायला हवी !