प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
जीवन म्हणजे पाण्यावर ओढलेली रेघ आहे. ‘ती तर मिटवायचीच !’, असे पक्के जाणूनच आपल्याला जीवन जगायचे आहे. एकदा हे मनात रूजले की, मान-अपमान, सुख-दु:ख यांपलीकडे जाऊन धैर्याने त्या भगवंताच्या वाटेने आपल्याला जायचे आहे, हे समजते. गुरुदेवांचे वाङ्मय, धर्मग्रंथ म्हणजे या वाटेला सुस्पष्टपणे प्रकाशित करणारी शलाका आहे.
चला तर मग या शलाकेच्या आधाराने स्वतःचे जीवन मंगल करण्याचा प्रयत्न करूया.
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)