उत्तरप्रदेशमध्ये कुख्यात गुंड आणि समाजवादी पक्षाचा नेता मुख्तार अन्सारी याचा कारागृहात हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर अन्सारी याचा मुलगा आणि कुटुंबीय यांनी ‘मुख्तार अन्सारी याची हत्या घडवून आणली’, असा आरोप केला आणि या आरोपावरून समाजवादी, काँग्रेस, एम्.आय.एम्., बसप आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ऊर बडवायला प्रारंभ केला आहे. अन्सारी याने शेकडो निरपराध यांच्या हत्या केल्या आणि घडवूनही आणल्या. त्या वेळी पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा; म्हणून या मंडळींनी कधी अश्रूही ढाळले नाहीत; मात्र अन्सारीच्या हत्येने लोकशाहीची हत्या झाल्याचा साक्षात्कार यांना झाला आहे. अन्सारी जिवंत असतांना त्याने ‘मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला’ असा आरोप केला होता. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ही सर्व मंडळी त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करतात, केवढी ही भूतदया ? एवढी भूतदया अन्सारीने हत्या केलेल्या पीडित कुटुंबियांप्रती दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला असता, तर ‘या मंडळींना खरोखरच लोकशाहीची चिंता आहे’, असे म्हणण्यात काही तथ्य होते. लोकशाही, राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव यांचा सोयीनुसार वापर करणार्या या मंडळींचे खरे स्वरूप आता जनतेने ओळखले आहे. ही तीच मंडळी आहेत, जी नक्षलवाद्यांनी निरपराध आदिवासींच्या हत्या केल्या की, गप्प बसतात; मात्र तेच नक्षलवादी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले, तर मात्र मानवाधिकार आयोगात जाऊन चौकशीची मागणी करतात. यांचा मानवतावाद आदिवासींच्या हत्येच्या वेळी जागृत होत नाही; मात्र नक्षलवादी गोळीबारात ठार होतात, तेव्हा जागृत होतो. याच नक्षलवाद्यांच्या शहरी म्होरक्यांना अटक झाल्यावर त्यांची ‘विचारवंत’, ‘पुरोगामी’ अशी प्रतिमा निर्माण करणारी आणि पोलिसांची अपकीर्ती करणारी हीच मंडळी आहेत. भारतात अल्पसंख्यांक म्हणून मुसलमानांची तळी उचलून धरायची; पण पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यांकांच्या हितासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केल्यावर मात्र त्याला विरोध करायचा, अशी या मंडळींची सोयीची भूमिका आहे. राज्यघटना, मानवतावाद आणि सर्वधर्मसमभाव हे सर्व सोयीनुसार बाळगणारी हीच मंडळी देशासाठी घातक आहेत.
मुख्तार अन्सारी याच्यावर उत्तरप्रदेशमधील विविध जिल्ह्यांसह देहली, पंजाब आदी राज्यांमध्येही ६५ हून अधिक गुन्हे नोंदवले गेले होते. यांमध्ये हत्या, अपहरण, दरोडा आदी गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. मागील ४० वर्षे त्याने गुन्हे करून स्वत:चे साम्राज्य निर्माण केले होते. कुख्यात गुंड असूनही आतंकवादाच्या जोरावर वर्ष १९९६ आणि २००२ मध्ये अन्सारी आमदार म्हणून निवडून आला होता. लोकशाहीमध्ये बळ आणि पैसा यांच्या जोरावर निवडून यायचे अन् गुन्हेगारी करायची, हीच जर लोकशाही असेल, तर अशा व्यवस्थेत कुणाचे हित आहे ? कारागृहात राहूनही अन्सारी हत्येच्या सुपार्या घेत होता. वर्ष २००५ मध्ये त्याला अटक झाली; मात्र कारागृहातही त्याचा पाहुणचार प्रतिष्ठित बंदीवानाप्रमाणे चालू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. भाजपचे नेते कृष्णानंद राय यांची निर्घृण हत्या घडवून आणतांना त्यांच्या शरिरावर ५०० गोळ्या मिळाल्या. अवधेश राय हत्या, विकासक मन्ना सिंह यांची हत्या, पोलीस अधिकारी शंकर जैस्वाल हत्या, विश्व हिंदु परिषदेचे नेते रूंगटा यांचे अपहरण आदी अनेक गंभीर गुन्ह्यांत अन्सारी याचा सहभाग होता. त्याच्या मृत्यूचे सुतक पाळणार्या पुरो(अधो)गामी, साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षवादी राजकीय पक्षांनी प्रथम याचे उत्तर द्यावे की, अन्सारी हा वारंवार लोकशाहीची हत्या करत होता, तेव्हा सुतक का पाळले नाही ? योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर अशा अन्सारीसारख्या गुंडांना सुतासारखे सरळ केल्यावर या गुंडांप्रती सहानुभूती दाखवणार्यांच्या लोकशाहीविषयीच्या संवेदनाही वांझोट्याच आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य काय ?
लोकशाहीचे मारेकरी कोण ?
‘अन्सारी याची हत्या म्हणजे लोकशाहीची हत्या’, असे म्हणून हमी मंडळी गळा काढतात; मात्र अन्सारी याच्यासारख्या कुख्यात गुंडाच्या अंत्ययात्रेला सहस्रो मुसलमान जमून त्याचे उदात्तीकरण करतात आणि त्याविषयी कुणी तोंड उघडत नाही. मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार असलेल्या आतंकवादी याकूब मेमनच्या अंत्ययात्रेलाही अशाच प्रकारे सहस्रो मुसलमान एकत्र जमले. एवढ्यावरच न थांबता याकूब मेमनच्या कबरीवर मुसलमानांनी रोषणाई केली. मागील २-३ वर्षांपर्यंत हा प्रकार चालू होता. मुसलमान अगदी देशद्रोही असला, तरी तो ‘मुसलमान’ असल्याने मुसलमान देशद्रोह्यांचेही उदात्तीकरण करतात. खरे तर हे देशासाठी धोक्याचे आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श घेणारे मुसलमान राष्ट्रासाठी योगदान देऊ शकतील; परंतु औरंगजेब, टिपू सुलतान यांचा आदर्श घेणारे भारतात लोकशाही शिल्लक ठेवतील का ? मुसलमानांची ही धर्मांध वृत्ती केवळ भारतात नाही, तर जगाच्या पाठीवर जेथे जेथे मुसलमान आहेत, तेथे ते प्रथम धर्मासाठी एकत्र येतात. ओसामा बिन लादेन याला ठार मारल्यानंतर अमेरिकेने त्याचे प्रेत खोल समुद्रात फेकून दिल्याचे घोषित केले; मात्र ते कुठे गडप केले ? याची माहिती दिली नाही. याचे कारण मुसलमान हा प्रथम मुसलमान असतो, त्यामध्ये मातृभूमीविषयीच्या देशप्रेमाला स्थान नाही. त्यामुळे लोकशाहीला पुढे करून हिंदुत्वाची अपकीर्ती करणारे तथाकथित धर्मनिरपेक्षवादी आणि धर्मांध यांना आदर्श मानणारे मुसलमान हे दोघेही देशासाठी धोकादायक आहेत.
मुसलमान आणि हिंदु यांतील धार्मिक वाद तेव्हाच संपेल, जेव्हा मुसलमान धर्मांधता सोडतील. याकूब मेमन काय किंवा मुख्तार अन्सारी काय यांसारख्या देशद्रोही अथवा गुंड यांना मुसलमान प्रथम ‘मुसलमान’ म्हणून पहात असतील आणि त्यांचे उदात्तीकरण करत असतील, तर असे धर्मांध भविष्यात बहुसंख्य झाल्यानंतर हिंदूंना सुखाने कसे जगू देतील ? असा प्रश्न हिंदूंना पडल्यास त्यात चुकीचे काय ? लोकशाही जिवंत ठेवायची भाषा जेव्हा होते, तेव्हा ती कुणामुळे जिवंत आहे ? याचाही विचार व्हायला हवा. आज भारतात बहुसंख्य हिंदूंमुळेच लोकशाही जिवंत आहे, ही वस्तूस्थिती आहे आणि ती नाकारून चालणार नाही. याकूब मेमन, मुख्तार अन्सारी यांच्यासारख्या देशविरोधी कारवाया करणार्यांच्या अंत्ययात्रेला धर्मांध बहुसंख्येने उपस्थित रहाणे, म्हणजे मुसलमानांच्या पुढच्या पिढीपुढे अशा लोकांचा आदर्श घेण्याचा संदेश देण्यासारखेच आहे. मुसलमान कितीही उच्चशिक्षित झाले, तरी ते त्यांची धर्मांधता सोडत नाहीत, हे मुख्तार अन्सारी याच्या अंत्यात्रेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले, हे केवळ हिंदूंनीच नव्हे, तर निधर्मी पोलीस, प्रशासन यांसह तथाकथित धर्मनिरपेक्षवादी यांनीही लक्षात घ्यावे.
मुख्तार अन्सारीचा मृत्यू म्हणजे ‘लोकशाहीची हत्या’ असे म्हणणार्यांना त्याने जेव्हा अनेकांच्या हत्या केल्या, तेव्हा लोकशाही का आठवली नाही ? |