अज्ञान आणि त्याच्यासमवेत अविद्या, अनिष्ट, आसक्ती, द्वेष यांना जाळणारी ज्ञानाची होळी लोकांमध्ये रंगांच्या रूपात उत्साह निर्माण करते खरी; पण त्याचे वावडे असणार्यांची संख्या भारतात बर्यापैकी वाढलेली पहायला मिळते. अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील होळीच्या विषयामुळेच रंगांचा हा सण ऐरणीवर आला आहे. ऐक्य आणि सामाजिक समरसता यांचे प्रतीक असलेली होळी खेळण्यासाठी अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील हिंदु विद्यार्थ्यांनी अनुमती मागितली आणि या कथित ‘नव्या पद्धती’ला मुसलमानांकडून मोठा विरोध चालू झाला. हिंदु विद्यार्थ्यांना रीतसर अनुमती घेऊन होळी खेळायची होती; कारण गेल्या वर्षीच्या मारहाणीचा अनुभव पाठीशी होता. बंदुका आणि काठ्या घेऊन फिरणार्या मुसलमानांनी होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांना अक्षरशः पाठलाग करून मारहाण केली होती. या प्रकरणी १० मुसलमानांना अटकही झाली होती आणि त्या १० जणांची सुटका करण्यासाठी अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या काही पुढार्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. ‘शांतीप्रिय’ मुसलमान समाजाचा हा अनुभव गाठीशी धरून यावर्षी हिंदूंनी कुणालाही, कसलीही अडचण येऊ न देता विश्वविद्यालयाच्या दूरच्या आवारात होळी साजरी करता यावी; म्हणून रीतसर अनुमती मागितली; मात्र त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे.
एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात अखिल भारतीय करणी सेनेने हिंदु विद्यार्थ्यांना पाठिंबा देत १० मार्चला ‘होली मीलन’ कार्यक्रम करणारच’, असे ठामपणे सांगितल्यावर चर्चासत्रात सहभागी झालेले समाजवादी पक्षाचे नेते तारीक अहमद लारी यांनी ‘तुम्ही या. तलवारींनी तुमचे स्वागत होईल’, अशी उघड धमकी दिली. राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या मुसलमान नेत्यांना लारी यांना रमझानचा पवित्र महिना चालू असल्याची आठवण करून द्यावी लागली, इतकी ही धमकी गंभीर आहे. समाजवादी पक्षाच्या मुसलमान नेत्याचे ‘दंगेखोर’ विधान ‘शांतीप्रिय’ समाजाला शोभणारे आहे का ? आणि मान्य आहे का ? या प्रश्नांची उत्तरे १० मार्चला मिळतीलच.
विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, विश्वविद्यालयात होळी प्रतिवर्षी खेळली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अनुमती कशाला हवी ? नवी पद्धत चालू करण्याची आवश्यकता नाही. नेहमीप्रमाणे होळी साजरी करा. असे आहे, तर मागील वर्षी होळी साजरी करणार्या विद्यार्थ्यांना मारहाण का झाली ? हा प्रकार पुन्हा घडू नये, विद्यार्थ्यांमधील परस्पर शांतीचे आणि सुरक्षेचे वातावरण बिघडू नये; म्हणून अनुमती मागितली, तर या ‘नव्या पद्धती’ला अडचण काय ? या विश्वविद्यालयात इतके उदारमतवादी आणि सर्वधर्मसमभावी वातावरण असते, तर हा विषय वादाचा ठरलाच नसता.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच या विश्वविद्यालयाच्या उपाहारगृहातील चिकन बिर्याणीचा ‘मेनू’ मागणीनुसार बीफ बिर्याणीमध्ये पालटतो; पण अनुमतीने रंग खेळायची अनुमती ‘नवी पद्धत’ म्हणून नाकारली जाते, हे केंद्र सरकारच्या अनुदानावर चालणार्या कथित ‘सर्वधर्मसमभावी’ विश्वविद्यालयातील ‘सर्वधर्मसमभावी’ उदाहरण १२ टक्के हिंदु विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे नाही का ?
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयात ३२ सहस्र विद्यार्थी शिकतात. त्यांत ४ सहस्र विद्यार्थी हिंदु आहेत. या विश्वविद्यालयात आतंकवादाला प्रोत्साहन देणार्या अनेक घटना घडल्याची वृत्ते अनेकदा प्रसिद्ध झाली आहेत. याच विश्वविद्यालयातील मुसलमान असलेला विद्यार्थ्यांचा एक म्होरक्या हा ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेचा भारतातील प्रमुख असल्यावरून त्याला आसाममध्ये अटकही करण्यात आली होती. येथेच भूगर्भशास्त्रात पीएच्.डी. करत असलेला मनान वानी हा आतंकवादी बनला होता आणि भारतीय सैन्याने त्याला ठार केल्यावर वर्ष २०१८ मध्ये याच विश्वविद्यालयातील १५ मुसलमान विद्यार्थ्यांनी वानी याच्यासाठी शोकसभा आयोजित केली होती. तेथील एका सांस्कृतिक कार्यक्रमात दाखवल्या जाणार्या नाटकांच्या भित्तीपत्रकामध्ये भारताच्या नकाशात काश्मीर दाखवण्यात आले नव्हते. वर्ष २०१९ मध्ये आगर्याचे तत्कालीन महापौर नवीन जैन यांनी ‘आतंकवाद्यांचा अड्डा बनलेल्या अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाला वाचवा’, अशी मागणी अलीगड प्रशासनाकडे केली होती. अशा एक ना अनेक घटना पुढे आल्या आहेत. आतंकवादी कारवायांना खतपाणी मिळण्याचे ठिकाण आणि तेथील मुसलमान विद्यार्थ्यांचे आतंकवादाच्या दिशेने जाणारे भविष्य लक्षात घेतल्यास तेथील हिंदु विद्यार्थ्यांकडे साहजिक भयोत्पादनाला पुरेपूर कारण आहे. असे असले, तरी पंतप्रधान मोदी यांनी अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाला ‘मिनी इंडिया’ (छोटा भारत) म्हटल्यामुळे या शिक्षणसंस्थेचे नाव खराब होऊ नये आणि आनंदाने होळी साजरी करता यावी, यासाठी हिंदु विद्यार्थ्यांनी अनुमती मागणे चूक आहे का ?
‘शांतीप्रिय’ मुसलमानांनी उत्तरे द्यायलाच हवीत !
हिंदू सर्वधर्मसमभाव किती मानतात, याची असंख्य उदाहरणे देता येतात. अगदी प्रतिवर्षी ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनात होळी खेळणारी लहान मुलगी नमाजपठणासाठी जाणार्या मुसलमान मुलाचे कपडे रंग लागून खराब होऊ नये, याची काळजी घेत असल्याचे विज्ञापन न चुकता दूरचित्रवाणीवर प्रसारित होते. अलीगड विश्वविद्यालयात ईद साजरी करण्याला तेथे शिकणार्या हिंदु विद्यार्थ्यांनी आजपर्यंत एकदाही आक्षेप घेतला नाही कि विरोध केला नाही. तरीही तेथील ‘शांतीप्रिय’ विद्यार्थी आणि त्यांचे पुढारी यांना होळीच्या रंगांचे वावडे का ? बरं, विश्वविद्यालयात नव्या पद्धती चालू करण्याला तेथील व्यवस्थापनाने विरोध करण्याचे कारण काय ? हाही प्रश्न आहेच. २१ व्या शतकातही विद्यार्थ्यांनी जुन्या पद्धती आणि जुने विचार यांनुसारच रहायचे का ? या कथित पुरोगाम्यांच्या लाडक्या प्रश्नाचे उत्तर अलीगड विश्वविद्यालयाच्या प्रशासनाने दिलेच पाहिजे, तरच ही शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना विकसित भारताच्या दिशेने पुढे नेत असल्याचे सिद्ध होईल.
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या नावाप्रमाणे ते केवळ मुसलमानांचे विश्वविद्यालय आहे का ? अलीगड मुस्लिम विद्यापीठ हा कुणाचा अड्डा आहे ? हिंदूंनी या विश्वविद्यालयाच्या नावावरूनच हे ठरवायचे का ? या प्रश्नांची उत्तरे अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे व्यवस्थापन आणि कथित ‘शांतीप्रिय’ मुसलमान समाजाने द्यायलाच हवीत, तरच त्यांच्यावरील रंगाचे वावडे असण्याचा डाग होळीनिमित्त धुऊन निघेल.
होळी म्हणजे ‘आम्हीही सर्वधर्मसमभावी आहोत’, हे सिद्ध करण्याची कथित ‘शांतीप्रिय’ मुसलमान समाजाला सुवर्णसंधी ! |