सप्तर्षींनी सकाळी उठल्यावर करायला सांगितलेल्या जपाची पक्ष्याने आठवण करून देणे आणि याद्वारे ‘साधक हा मंत्रजप करत आहेत ना ?’, याकडे लक्ष ठेवू’, या सप्तर्षींच्या वचनाची आठवण होणे

जुन्नर, पुणे येथील श्री. संजय दत्तात्रय जोशी हे रामनाथी आश्रमात आले असतांना त्यांना सप्तर्षींनी दिलेल्या नामजपासंदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. संजय दत्तात्रय जोशी

१. मी प्रतिदिन रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील आगाशीत बसून उन्हाचे उपाय आणि जप करत असतो. ३०.१.२०२४ या दिवशी सकाळी साधारण ८ वाजता एक पक्षी माझ्या अगदी जवळ समोर येऊन चिवचिवाट करत होता. तेव्हा मला आठवले की, मी आज सकाळी उठल्यावर महर्षींनी करायला सांगितलेला जप केलेला नाही. तेव्हा मला आठवले, ‘महर्षींनी त्या सूचनेत पुढे असे म्हटले होते की, आम्ही सप्तर्षी साधक मंत्रजप करत आहेत कि नाही, ते पक्षी, प्राणी, हत्ती, किंवा मुंगी या रूपात येऊन पाहू.’ मी कृतज्ञतेच्या भावाने महर्षींची क्षमायाचना केली आणि पक्ष्याला सांगितले, ‘मी त्वरित जप करतो. आठवण करून दिल्याबद्दल कृतज्ञता.’

२. परत एके दिवशी असेच झाले. जप करत असतांना तिथेच पूर्वेकडील झाडीतून एक पक्ष्याचा वेगळाच आवाज येत होता. तो आवाज तिथे बसलेल्या साधकांनीही ऐकला. तेव्हा मी मागील प्रसंग सांगून ‘आजही मी जप केलेला नाही, आठवण करून दिल्याबद्दल कृतज्ञता’, असे म्हणून जप केला.

जप करायचा राहिला की, त्या दिवशी महर्षी आपल्याला आठवण करून देत असतात. त्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. संजय दत्तात्रय जोशी (वय ५८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), जुन्नर, जिल्हा पुणे. (५.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक