कै. राघवेंद्र माणगावकर यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होण्याच्या संदर्भात श्री. राम होनप यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

श्री. राम होनप

१. ‘काही दिवसांपासून मला राघवेंद्र माणगावकरकाका यांचा चेहरा पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ तेजस्वी वाटत होता.

२. काकांचे बोलणे ऐकून माझा भाव जागृत होत असे.

३. ३.३.२०२४ या दिवशी रात्री ८.३० वाजता मी ध्यानमंदिरात नामजपादी उपायांसाठी बसलो होतो. तेव्हा माझ्या मनात अकस्मात् विचार आला, ‘हल्ली कुणा साधकाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाली नाही.’ त्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘माणगावकरकाकांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’ नंतर मी रात्री ९ वाजता काकांचा मुलगा श्री. वैभव यांच्याकडे काकांचे नुकतेच काढलेले छायाचित्र मागितले. त्याने काकांचे छायाचित्र लगेच काढून रात्री ९.२९ वाजता मला ते पाठवले. त्यांच्या छायाचित्राकडे पाहून मला भाव आणि आनंद जाणवला. दुसर्‍या दिवशी, म्हणजे ४.३.२०२४ या दिवशी पहाटे काकांचे निधन झाले झाल्याचे मला समजले.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक