व्यापार्याच्या हत्येचे प्रकरण !
मुंबई – व्यापारी सय्यद फरीद मकबूल यांच्या हत्येच्या आरोपांतून विशेष केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (सीबीआय) न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन याची ७ मार्च या दिवशी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली, तर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक एजाज लकडावाला याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली.
वर्ष १९९६ मध्ये व्यापारी सय्यद फरीद मकबूल यांच्या महंमद अली रोड परिसरातील दुकानात घुसून लकडावाला आणि त्याचे साथीदार यांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये सय्यद फरीद मकबूल यांचा मृत्यू झाला. दाऊद आणि राजन यांच्यातील टोळी युद्धाच्या वेळी हे आक्रमण करण्यात आले होते. सय्यद यांच्यावर गोळीबार करणार्यांमध्ये एजाज लकडावाला याचाही समावेश असल्याचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते. न्यायाधीश ए.एम्. पाटील यांनी लकडावाला याला शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत दोषी ठरवले.