Jaishankar On China : आमचे शेजारी लिखित करारांचे उल्लंघन करतात !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावले !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

टोकियो (जपान) – अनेक सूत्रांवर आमचे (भारत-चीन) एकमत नाही. आमचे शेजारी लिखित करारांचे उल्लंघन करतात, तेव्हा ही चिंतेची गोष्ट आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांच्या स्थिरतेवर प्रश्‍न निर्माण होतात, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले. ते येथे रायसिना गोलमेज परिषदेत बोलत होते. जयशंकर म्हणाले की, वर्ष १९७५ ते २०२० या काळात सीमेवर शांतता होती. वर्ष २०२० मध्ये गलवान संघर्षानंतर सर्व काही पालटले आहे.

चीनला लक्ष्य करतांना डॉ. जयशंकर म्हणाले की, जग पालटत आहे आणि भारताचे इतर देशांसमवेतचे संबंधही पालटत आहेत.