प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
‘ईश्वर नित्यमुक्त आहे. सकाम कर्म केले आणि भगवंताकडे फळ मागितले, तर ते तो अवश्य देतो; पण ते फळ निकृष्ट करते, अंगलट येते. फळच न मागितले, तर फळ देण्याचे त्याचे स्वातंत्र्य कायम रहाते. योग्य वेळी प्रारब्ध अनुकूल असेल, अशा वेळी नेमके तो ते फळ देतो. जे अनेक पटींनी फळते ! न मागणार्यालाच सगळे मिळते ! भगवंताची प्रसन्नता आणि कृपाही त्यालाच लाभते. यज्ञकर्मही भगवंताला समर्पित केल्याने या सृष्टीच्या अनंत फाफट-पसार्यात त्याला ते कर्मफळाने संधी देऊन त्याचे कल्याण करते. भक्त म्हणतो, ‘‘भगवंता, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या इच्छेचे मूल्य शून्य !’’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२३)