संपादकीय : हलाल प्रमाणपत्रांची निरर्थकता !

जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष आणि ‘हलाल फाऊंडेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना महमूद असद हुसैन मदनी यांनी हलाल प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या प्रकरणी लक्ष्मणपुरी पोलिसांच्या विशेष कृती दलाने नुकतीच त्यांची चौकशी केली. मदनी यांचे लोकप्रियतेचे वलय पहाता भविष्याच्या दृष्टीने ही चौकशी नक्कीच महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. एवढेच नव्हे, तर विशेष कृती दल (एस्.टी.एफ्.) आता हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांशी संबंधित आस्थापनांचीही चौकशी करणार आहे, तसेच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हलाल प्रमाणपत्रांशी संबंधित आस्थापनांच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराची चौकशी करणार आहे. या अगोदर १३ फेब्रुवारीला लक्ष्मणपुरी पोलिसांनी ‘हलाल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या ४ पदाधिकार्‍यांना उत्पादनांचे नमुने न पहाता किंवा चाचणी न करता संबंधित आस्थापनांना खोटे हलाल प्रमाणपत्रे दिल्याच्या प्रकरणी अटक केली होती. नमुन्यांची चाचणी केली न जाणे हे गंभीर आहे; पण अटक केलेल्या चौघांवर कोणती कारवाई करण्यात आली, हे समाजासमोर उघड होणे महत्त्वाचे आहे. मुंबईच्या ‘हलाल कौन्सिल ऑफ इंडिया’ला (‘नॅशनल सर्टिफिकेशन बॉडी ॲक्रिडिटेशन बोर्ड’ला) इतर कोणत्याही सरकारी संस्थेने हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकृत केलेले नाही. असे असतांना तेथे पदाधिकार्‍यांची नियुक्ती कशी केली जाते ? याविरोधात पोलीस काहीच कारवाई का करत नाहीत ? विशेष कृती दलाच्या अधिकार्‍यांनीही जेव्हा मदनी यांना मुंबईच्या ‘हलाल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या कार्यालयाविषयी विचारले, तेव्हा त्यांनी अधिक माहिती देण्याचे जाणूनबुजून टाळले. त्यांची ही कृती दुर्लक्षून चालणार नाही.

उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाद्वारे मदनीची चौकशी

मध्यंतरी हलालशी संबंधित काही संस्था, उत्पादनांशी संबंधित आस्थापने, त्यांचे मालक आणि व्यवस्थापक, तसेच इतरांविरुद्ध हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली अनावश्यक पैसे उकळणे अन् धर्माच्या नावावर शत्रुत्व वाढवणे या आरोपांखाली नोव्हेंबर २०२३ मध्ये हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हलाल प्रमाणपत्रांमागील षड्यंत्र !

मुळात ‘हलाल प्रमाणपत्रांचे वाटप का केले जाते ?’, असा प्रश्न कुणालाही पडेल आणि ‘हलाल प्रमाणित वस्तूंसाठी ते प्रमाणपत्र असेल’, अशा स्वरूपाचे उत्तरही कुणी गृहित धरू शकते; पण वास्तव तसे नाही. हलालच्या उत्पादनांची विक्री वाढवायची आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवायचा, हे त्यामागील मूळ कारण आहे. हलालच्या प्रत्येक उत्पादनामागे १ सहस्र रुपयांपासून १० सहस्र रुपये इतकी किंमत आकारली जाते. थोडक्यात काय, तर हलाल प्रमाणपत्रांचा बाजारच मांडण्यात येतो. हे सर्व करायचे भारतात आणि यातून मिळणारा आर्थिक लाभ मात्र घेणार इस्लामी राष्ट्रे ! प्रमाणपत्रांचे वाटप केले जाण्यामागे मुसलमानांचे असलेले मोठे षड्यंत्र भारतियांनी वेळीच लक्षात घ्यायला हवे. भारत शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ्.एस्.एस्.ए.आय.)’ असतांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्‍या इस्लामी संस्था अस्तित्वात आणण्याची आवश्यकताच नाही. या संस्थांना वैश्विक प्रमाणीकरणही नसते. त्यामुळे या संस्थांवर बंदी आणून हलाल प्रमाणपत्राला निरर्थक ठरवले गेले पाहिजे.

‘या प्रकरणाच्या चौकशीतून मोठे सत्य समोर येणार असल्याने साहजिकच मदनी यांनी ७ दिवसांचा वेळ मागून खरे बिंग उघड होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली आहे’, हे न कळण्याइतके हिंदू दूधखुळे नाहीत. हिंदूबहुल भारतात एखाद्या संशयित हिंदूलासुद्धा अशा प्रकारे वेळ दिला जात नाही. उलट आरोपांच्या फैरी झाडून त्याला आरोपीच्या पिंजर्‍यातच उभे केले जाते; पण अन्य धर्मियांच्या संदर्भात मात्र चर्चा, चौकशी, जुजबी कारवाई इतकेच होतांना आढळते. हलालसारखे राष्ट्रघातकी षड्यंत्र पहाता संबंधितांची प्रतिदिन चौकशी का केली जात नाही ? संशयितांना अशा प्रकारे वेळ देणे, म्हणजे थोडक्यात त्यांनी केलेल्या गुन्ह्यांवर त्यांनाच पांघरूण घालण्यासाठी वेळ देणे नव्हे का ? हलालच्या संदर्भातील गुन्हा, म्हणजे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर रचले जाणारे व्यापक षड्यंत्र आहे. हलालच्या विरोधातील युद्ध म्हणजे जिहादच्या विरोधातील युद्ध आहे. युद्धात विराम घ्यायचा नसतो. ते प्रतिदिन लढायचे असते. प्रतिदिन त्यातील बारकावेही चौकशीअंती उघड व्हायला हवेत. स्वतःसाठी मागून घेतलेल्या ७ दिवसांमध्ये मदनी यांनी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून साध्य काय होणार ? याचाही विचार अन्वेषण यंत्रणांनी करायला हवा !

मदनींना मुसलमानप्रेमाचा उमाळा !

जगातील ५०० सर्वांत प्रभावशाली मुसलमानांच्या सूचीत मौलाना महमूद मदनी यांचा समावेश आहे. जॉर्डनच्या ‘द रॉयल ऑल अल् बैत इन्स्टिट्यूट फॉर इस्लामिक थॉट’ने ही सूची सिद्ध केली असून मदनी त्यात १५ व्या स्थानावर आहेत. तालिबान, हिजबुल्लाह अशा आतंकवादी संघटनांशी संबंधित लोकांचाही सूचीत समावेश आहे. मध्यंतरी ज्ञानवापीचा वाद चालू असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या मोर्चात ते म्हणाले होते, ‘‘सध्या मुसलमानांना चालणेही कठीण झाले आहे. आपल्याच देशात आपल्याला परके बनवले गेले आहे. जे प्रकार घडत आहेत, त्यासाठी मुसलमानांनी तुरुंगात जाण्याची सिद्धता ठेवावी.’’ कोणता देश ? तर भारत आणि कुणाचा म्हणे तर आपला ? भारत देश केवळ हिंदूंचा आहे आणि तो हिंदूंचाच रहाणार. त्यामुळे ‘आपला देश’, ‘परकेपणा’ हे शब्द मुसलमानांना उच्चारण्याचा अधिकारच काय ? हिंदूंवर अन्याय, अत्याचार करायचे, तर कारागृहात जावे लागणारच, हे त्यांनी लक्षात घ्यावे; कारण आता हिंदूच नव्हे, तर हिंदुत्वही जागृत होत आहे.

‘हलाल जिहाद’ हद्दपार होणारच !

काही वर्षांपूर्वी ‘हलाल’ म्हणजे काय ? हलालच्या माध्यमातून भारतात जिहादची बीजपेरणी कशा प्रकारे होत आहे ? याविषयी सर्वच जण अनभिज्ञ होते. काळ पालटला, देशात हिंदुत्वाचे वारे वाहू लागले, राष्ट्रघातकी घटनांना उघडपणे विरोध होऊ लागला. त्यातूनच हलाल जिहादचे भयावह रूप समोर आले. हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटनांकडून हलालला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. हलालला भारतातून हद्दपार करण्यासाठी आणि इस्लामीकरणाचे व्यापक षड्यंत्र नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचीच परिणती आता बनावट हलाल प्रमाणपत्रांच्या प्रकरणी काहींना अटक झाली आहे. हलालला होणार्‍या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हिंदूंसाठीचे हे आश्वासक पाऊलच आहे.

उत्तरप्रदेश शासनाने हलाल प्रमाणित उत्पादनांचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वितरण करणे यांवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. अन्य राज्यांतील सरकारांनीही असे आवाहन करायला हवे. तसे झाल्यास हलाल जिहाद भारतातून हद्दपार होऊ शकतो. ‘तो दिवस लवकरच येवो’, ही राष्ट्रप्रेमी हिंदूंची अपेक्षा !

खोट्या हलाल प्रमाणपत्र प्रकरणी काहींना अटक होणे हे हलालविरुद्धच्या लढ्यातील हिंदूंसाठीचे आश्वासक पाऊल !