अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केवळ २ वर्षांमध्ये ३०१ शस्त्र परवाने !

प्रतिकात्मक चित्र

अहिल्यानगर – जिल्ह्यांमध्ये वर्ष २०१० ते २०२० या कालावधीमध्ये ३७९ जणांना रिव्हॉल्व्हरचे शस्त्र परवाने देण्यात आले आहेत, तर जानेवारी वर्ष २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२३ म्हणजे केवळ २ वर्षांमध्ये ३०१ शस्त्रपरवाने देण्यात आले; परंतु महत्त्वाचे म्हणजे सख्ख्या भावांसह पती-पत्नी यांनाही शस्त्र परवाने दिले असल्याची माहिती सचिन पाचपुते यांनी माहिती अधिकारांतून मिळवली आहे.

जिल्ह्यांतील नेवासे (२ कुटुंबे), संगमनेर, श्रीगोंदे, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये सख्ख्या भावांना परवाने देण्यात आले आहेत. याचे अन्वेषण झाले पाहिजे. श्रीगोंदे तालुक्यामध्ये २४ जणांना शस्त्र परवाने दिले आहेत. त्यातील काही जणांकडे एवढी मालमत्ता नाही की, त्यांना कुणीही धमकी देईल; परंतु त्यांना परवाने देण्यात आले आहेत. पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वर्षांतून केवळ ५ पर्यंत शस्त्र परवाने दिले जात असतांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एवढे परवाने कसे दिले गेले ? असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.