देहूरोड पोलीस ठाण्यातील २ पोलीस कर्मचार्यांचा सहभाग
पिंपरी (पुणे) – महाविद्यालयीन तरुण वैभवसिंग चौहान याला गांजा विक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून ४ लाख ९८ सहस्र रुपये उकळले. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यासमवेत त्यांचे साथीदार अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, महंमद मिर्झा, शंकर गोरडे आणि मुन्नास्वामी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी या तरुणाने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. पोलीसदलातील २ कर्मचार्यांचा अपहरण आणि खंडणी या प्रकरणांत सहभाग असल्याचे उघड झाल्याने पोलीसदलामध्ये खळबळ उडाली आहे.
१९ वर्षीय वैभवसिंग हा किवळे येथील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असून महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये रहातो. सर्व आरोपींनी त्याला हेरून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा कट केला. १० फेब्रुवारी या दिवशी त्याला पकडून देहूरोड पोलीस ठाण्यात आणले. गांजाच्या विक्रीच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यांच्या धमकीच्या भीतीने चौहान याने ‘गूगल पे’ आणि ‘ऑनलाईन बँकिंग’द्वारा ४ लाख ९८ सहस्र रुपये त्यांना दिले. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी इतर साथीदारांना अटक केली असून संबंधित पोलीस कर्मचार्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
संपादकीय भूमिका :
|