अर्ध्याहून अधिक अमेरिकी नागरिक जीवनात असमाधानी !

‘गॅलप’ आस्थापनाच्या सर्वेक्षणात मांडण्यात आली आकडेवारी !

प्रतिकात्मक छायाचित्र

वॉशिंग्टन (अमेरिका) – अर्ध्याहून अधिक अमेरिकी नागरिक आज स्वत:च्या वैयक्तिक जीवनात असमाधानी असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकींच्या आनंदाची पातळी ही आता ४७ टक्क्यांपर्यंत पोचली असून वर्ष २०११-१२ मध्ये ४६ टक्के लोकच आनंदी होते. त्यामागील कारण हे वर्ष २००८-०९ मधील भयावह आर्थिक मंदी असल्याचे मानले जाते. संशोधन आणि व्यवस्थापन सल्लागार आस्थापन ‘गॅलप’च्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे.

अशी आढळली अमेरिकी नागरिकांची टक्केवारी !

‘गॅलप’च्या वर्ष २०२० मधील अभ्यासात ६५ टक्के अमेरिकी आनंदी असल्याचे निष्पन्न झाले होते. अलीकडच्या काळातील जगभरातील अशांतता, आर्थिक अस्थिरता आणि अधिकचा हव्यास हे लोकांच्या असमाधानाचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.

विवाहित अमेरिकींपेक्षा अविवाहित कमी आनंदी

सर्वेक्षणात वार्षिक ९० लाख रुपयांहून अधिक कमाई करणारे सर्वाधिक आनंदी दिसून आले. त्यांची संख्या ५८ टक्के होती. (अशा सर्वेक्षणात आनंदाची व्याख्या काय, हे पडताळले पाहिजे. बाह्य परिस्थितीचा मनाच्या आनंदमय अवस्थेवर परिणाम होऊ न देणे, ही आनंदाची वास्तविक व्याख्या आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. – संपादक) अविवाहित विवाहित लोकांपेक्षा अल्प आनंदी असल्याचे आढळले. ज्यांचा विवाह झाला नाही, असे ३८ टक्के लोक, तर विवाहितांपैकी ५७ टक्के लोक आनंदी आढळले.

संपादकीय भूमिका

  • पैसा, म्हणजेच भौतिक विकासामुळे मानवी जीवन आनंदी होते, अशी समजूत असणार्‍यांना हे केवळ एक मृगजळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतातील कोट्यवधी लोक आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत रहात आहेत; परंतु ते अमेरिकी लक्षाधीशांपेक्षाही आनंदी आहेत. यामागील कारण म्हणजे त्यांची नाळ हिंदु धर्माशी जोडलेली आहे आणि ते धार्मिक जीवन जगतात ! यामुळे आज सहस्रावधी पाश्‍चात्त्य भारतातील साधू-संतांचा आश्रय घेत आहेत !