उत्तराखंडमध्ये मुसलमानांचा समान नागरी कायद्याला विरोध !

मुसलमानांचा समान नागरी कायद्याला विरोध

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड विधानसभेने समान नागरी विधेयक संमत केले आहे. अशातच राज्यातील मुसलमान त्यास विरोध करू लागले आहेत. राज्यातील मुसलमानांकडून या विधेयकाला विरोध करणारे काही व्हिडिओजही प्रसारित झाले आहेत. एक मुसलमान तरुण म्हणतो, ‘आम्ही या कायद्यानुसार नव्हे, तर शरीयतनुसार वागणार. शरीयतनुसार ४ विवाह करता येतात. समान नागरी विधेयकात एका विवाहालाच अनुमती आहे. शरीयतनुसार ४ विवाह करायचे आहेत, तर आम्ही एकच विवाह का करायचा ? आता समजा एखाद्याला (मुसलमानाला) एक पत्नी आहे. आता त्याला एकच पत्नी असणे चांगले वाटले नाही आणि दुसरी महिला विवाहासाठी तयार असेल, तर तिला ‘नाही’ का म्हणावे ? विधेयकात दोन मुलांना जन्म देण्याविषयी लिहिले आहे. हे कसे काय ? ते तर अल्लाच्या हातात आहे.

शहरातील जामा मशिदीचे शहर काझी (शरीयतनुसार न्यायदान करणारा) महंमद अहमद कासमी यांनी या विधेयकाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. मुसलमानांना लक्ष्य करून कायदा आणल्याचा आरोप करत ते म्हणाले होते की, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी असे करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंना असहिष्णु आणि हिंसाचारी ठरवून भारतात लोकशाहीची हत्या होत असल्याची ओरड करणारे आता ‘समान वैयक्तिक अधिकार’ देणार्‍या कायद्याला मुसलमानांकडून विरोध होत असल्यावरून गप्प का ?