पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांचा हास्यास्पद दावा !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांमध्ये अशी तरतूद आहे की, काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत आयोजित मुक्त आणि निष्पक्ष सार्वमताद्वारे लोकांच्या इच्छेनुसार सोडवला जाईल; पण दुर्दैवाने काश्मिरी लोक या अधिकाराचा वापर करू शकत नाहीत. भारताने काश्मीरवर बेकायदेशीररित्या नियंत्रण ठेवले आहे, असे विधान पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी केले. पाकिस्तान काश्मीरसाठी ‘काश्मीर एकता दिवस’ साजरा करत असतो.
डॉ. अल्वी पुढे म्हणाले की, काश्मीर जगातील सैनिकी क्षेत्रांपैकी एक आहे; म्हणजे येथे सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. काश्मीरमधील जनता भीतीच्या छायेत जगत आहे. (पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे ! – संपादक)
काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर म्हणाले की, गेल्या ७६ वर्षांत अनेक काश्मिरींनी बलीदान दिले आहे. आज त्यांना आदरांजली वहाण्याची संधी आहे.
Message from President Dr. Arif Alvi on the occasion of Kashmir Solidarity Day. pic.twitter.com/0Hb6pMAU6x
— The President of Pakistan (@PresOfPakistan) February 5, 2024
संपादकीय भूमिकापाकने बेकायदेशीररित्या नियंत्रणात घेतलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक लोक पाकच्या विरोधात आंदोलन करत असून त्यांना पुन्हा भारतात यायचे आहे. याकडे पाकच्या शासनकर्त्यांनी लक्ष ठेवावे आणि नंतर भारताकडे बोट दाखवावे ! |