AIMPLB Threatens On WAQF Bill : वक्फ सुधारणा विधेयक संमत झाले, तर देशव्यापी आंदोलन करू !

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची चेतावणी

नवी देहली – वक्फ सुधारणा विधेयक २ एप्रिल या दिवशी लोकसभेत सादर करण्यात आल्यावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते डॉ. सय्यद कासिम रसूल इलियास म्हणाले की, जर हे विधेयक संसदेत संमत झाले, तर आम्ही त्याविरुद्ध देशव्यापी आंदोलन चालू करू. आम्ही शांत बसणार नाही. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदींचा आम्ही वापर करू. प्रस्तावित सुधारणा मागे घेईपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करू’, अशी चेतावणी दिली.

डॉ. इलियास पुढे म्हणाले की, हे विधेयक भेदभाव करणारे आणि धार्मिकतेने प्रेरित आहे. संयुक्त संसदीय समितीमधील विरोधी सदस्यांचे विचार देखील विचारात घेतले गेले नाहीत हे दुःखद आहे.

संपादकीय भूमिका

लोकशाहीचा अपलाभ घेऊन मुसलमान संघटना समाजाला कशा प्रकारे वेठीस धरत आहेत, याचे हे उदाहरण. अशा संघटनांना सरकारने अद्दल घडवणे आवश्यक !