पुणे येथे २ दिवसांचे आंतरराष्ट्रीय ज्योतिष संमेलन उत्साहात पार पडले !

धनकवडी (जिल्हा पुणे) – टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात २ दिवसांचे आंतरराष्ट्रीय ज्योतिष संमेलन झाले. ज्योतिषतज्ञ एच्.एस्. रावत यांच्या हस्ते या संमेलनाचे उ‌द्घाटन झाले. ज्योतिषतज्ञ आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी होते. या वेळी लेखक आणि वक्ते प्रदीप पंडित यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंडित यांची विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक मासिकांत त्यांनी लेखन केले आहे. याची नोंद घेऊन वास्तूतज्ञ पंडित रमेश पलंगे आणि सुषमा पलंगे यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजक डॉ. दत्तप्रसाद चव्हाण, दादा शेवाळे, आदिनाथ साळवी, गौरी केंजळे, कैलाश केंजळे आदी उपस्थित होते. ‘जयसिंगराव चव्हाण स्मृती आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशन’च्या वतीने याचे आयोजन केले होते.