देवाची ओढ असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके (वय ४ वर्षे) !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २०२१ मध्ये ‘चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि  त्याच्यातील  भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३१.१.२०२४)


उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके हा या पिढीतील एक आहे !

आज पौष कृष्ण षष्ठी (१.२.२०२४) या दिवशी चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके याचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी-आजोबा यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. पद्मनाभ साळुंके

चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके याला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. सौ. अश्‍विनी कार्तिक साळुंके (चि. पद्मनाभाची आई), फोंडा, गोवा.

१ अ. चांगली स्मरणशक्ती : ‘पद्मनाभची स्मरणशक्ती चांगली आहे. तो नवीन ठिकाणी गेल्यावर निरीक्षण करतो आणि तेथील वस्तू त्याच्या लक्षात रहातात. तो वस्तू आणि ठिकाणे यांची नावे अचूक सांगतो.

१ आ. त्याला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवडतो.

सौ. अश्‍विनी साळुंके

१ इ. सहनशील : तो ३ वर्षांचा असतांना त्याला पोटाचा विकार झाला होता. त्या वेळी त्याला पुष्कळ वेदना होत होत्या. त्याने वेदना सहन केल्या आणि आम्हाला त्रास दिला नाही. अन्य वेळी त्याला काही लागले किंवा तो रुग्णाईत असला, तर तो मला म्हणतो, ‘‘आई, मला थोडेच लागले आहे. मला काही झालेले नाही. मला थोडा ताप होता. मी आता बरा आहे.’’

१ ई. समंजस : मी दिवसभर सेवेसाठी आश्रमात असते. त्या वेळी पद्मनाभ त्याच्या आजी-आजोबांजवळ रहातो. तो मला ‘तू आश्रमात जाऊ नकोस’, असे कधीच सांगत नाही. मला घरी जाण्यास उशीर झाला, तरीही तो मला समजून घेतो. त्याचे वडील (श्री. कार्तिक) सेवेनिमित्त देहली येथे असतात. ते काही दिवसांसाठी घरी येतात आणि पुन्हा देहली येथे जातात. पद्मनाभचे वडील घरातून निघत असतांना तो रडत नाही. तो स्थिर असतो. त्याचे वडील देहली येथे गेल्यावरही तो वर्तमानात असतो.

१ उ. देवपूजा करायला आवडणे : त्याला देवपूजा करायला फार आवडते. देवघरात देवतांची मांडणी आधी जशी असते, त्याचप्रमाणे पद्मनाभ मांडणी करतो. माझ्याकडून कधी त्यात पालट झाला, तर तो मला त्याची जाणीव करून देतो.

१ ऊ. देवळात जायला आवडणे : त्याला देवळात जायला आवडते. मार्गात एखादे देऊळ लागल्यास पद्मनाभ ‘ते देऊळ कोणत्या देवतेचे आहे ?’, हा प्रश्‍न आवर्जून विचारतो. तो आम्हाला सांगतो, ‘‘आपण तेथे जाऊया.’’ तो शाळेत जातांना मार्गात असणार्‍या प्रत्येक देवळातील देवतेचा जयजयकार करतो आणि शाळेत पोचेपर्यंत त्या देवतेचा नामजपही करतो.

१ ए. इतरांना समजून घेणे : माझी प्रकृती कधी ठीक नसल्यास पद्मनाभ मला समजून घेतो. तो हट्ट करत नाही. तो मला साहाय्य करतो. तो मला म्हणतो, ‘‘मी मोठा झाल्यावर तुला सर्व प्रकारे साहाय्य करीन.’’

१ ऐ. तो प्रत्येक कृती करण्यापूर्वी मला विचारतो.

१ ओे. चुकांविषयी संवेदनशील : पद्मनाभ मला त्याच्या चुका सांगतो. ते मी वहीत लिहून घेते. तो स्वतःकडून झालेल्या चुका आणि त्या मागील अयोग्य विचार प्रामाणिकपणे सांगतो. मी आश्रमात सेवा करत असतांना तो घरी असतो. त्या वेळी तो मला भ्रमणभाष करून चुका सांगतो. त्याच्याकडून पूर्वी होत असलेल्या चुकांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. पद्मनाभकडून काही चुका झाल्यास आम्ही त्याला सौम्य प्रकारचे प्रायश्‍चित्त घ्यायला सांगतो. तो त्याचे पालन करतो.’

१ औ. स्वभावदोष : ‘राग येणे

‘प.पू. गुरुदेवा, तुम्हीच आमच्याकडून पद्मनाभचे संगोपन करण्याची सेवा तुम्हाला अपेक्षित अशी करून घ्या. त्यातून आमची साधना होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

२. सौ. शोभा साळुंके आणि श्री. सूर्यकांत साळुंके (चि. पद्मनाभचे आजी-आजोबा), फोंडा, गोवा.

२ अ. समंजस : ‘पद्मनाभ दुपारी आमच्या समवेत असतो. तो आम्हा दोघांनाही समजून घेतो. तो आम्हाला त्रास देत नाही. तो आमच्या समवेत चांगल्या प्रकारे रहातो.

२ आ. प्रेमभाव : तो आम्हाला औषधे घेण्याची आठवण करून देतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ७.१.२०२४)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.