१. अधिवक्ता नितीन य. पाटील, कोल्हापूर
अ. ‘सर्व साधकांचा नम्रपणा हा सर्व हिंदूंना आदर्शवत आहे. त्याचप्रमाणे येथील स्वच्छता, कार्यप्रणाली वाखाणण्याजोगी आहे.’
२. श्री. आनंदराव पांडुरंग पवळ (प्रांत अध्यक्ष, भ्रष्टाचारविरोधी जागृती समिती), आंबेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.
अ. ‘रामनाथी आश्रम हा मनाला शांतता देणारा आश्रम आहे.
आ. आश्रमातील व्यवस्था पुष्कळ उत्तम आहे.’
३. श्री. शरद आनंदा माळी (संस्थापक अध्यक्ष, गुरुकुल मार्शल आर्ट ॲकॅडमी), उंचगाव, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर.
अ. ‘मनुष्य जीवनात कोणताही संघर्ष असो, तो संपवून मनुष्य अंतिम शांतीच्या प्रतीक्षेत असतो. ती अंतिम शांतता येथे आश्रमात आल्यावर जाणवते.’
४. श्री. सूरज मांढरे (श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान), सातारा
अ. ‘रामनाथी आश्रमात सात्त्विकता जाणवली.
आ. आश्रमात आल्यावर वातावरण प्रसन्न वाटले आणि आनंद झाला.
इ. आश्रमात मला पुष्कळ छान वाटले.
ई. मी साधना, नामजप, व्यष्टी आणि समष्टी सेवा वाढवीन.’
५. अधिवक्त्या (सौ.) अर्चना बोगम, सोलापूर
अ. ‘मी आश्रमात दुसर्यांदा आले. येथील वातावरण पुष्कळ चैतन्यमय आहे. येथे आल्यावर मनापासून आनंद होऊन कृतार्थ वाटले.’
६. श्री. बापू शंकरराव ढगे (उपाध्यक्ष, भावसार समाज), सोलापूर
अ. ‘आश्रमातील सात्त्विकता, साधकांचा भाव आणि त्यांच्यातील विनम्रता अत्यंत आनंद देणारी आहे.’
७. श्री. धर्मराज ऋषिराज महानुभव, बांबोरी, ता. राहुरी, जिल्हा अहिल्यानगर
अ. ‘आश्रमाची व्यवस्था पुष्कळच सुंदर आहे. येथे सनातन धर्माला पोषक असे परिपूर्ण नियोजन आहे आणि वातावरण संपूर्ण सात्त्विक आहे. मनाला आनंद वाटला.’
८. डॉ. अजित मधुकररावजी चौधरी (प्राचार्य, यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निक), बीड, परभणी.
अ. ‘आश्रमामध्ये सात्त्विकता आणि सकारात्मक ऊर्जा यांचा जणूकाही महापूर येत आहे’, असे जाणवले.’
९. श्री. नीलेश राजेंद्र माडीवाले (शहर संयोजक, बजरंग दल), येवला, जिल्हा नाशिक.
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला पुष्कळ प्रसन्न वाटले.
आ. आश्रमात सात्त्विकता जाणवली.’
१०. श्री. सागर सतीश देशमुख (श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान), नाशिक
अ. आश्रम पाहून अत्यंत प्रसन्न वाटले. सात्त्विक कार्याची अनुभूती आली. ‘लवकरच पत्नी आणि मुलाबाळांसह पुन्हा एकदा आश्रम पहाण्यास येऊ. हा आश्रम भगवंताचे अधिष्ठान असलेला पवित्र आणि सात्त्विक आहे’, असे मला वाटले.
११. श्री. किसन शामराव गांगुर्डे (न्यासी, वैजनाथ महादेव मंदिर ), देवाघाट, मालेगाव.
अ. ‘आश्रमात सात्त्विकता, शांतता आणि समृद्धी अनुभवायला मिळाली. येथील साधक अगदी मनापासून आश्रमाची माहिती सांगतात.’
१२. अधिवक्त्या (कु.) गायत्री प्रकाश वाणी, धुळे
अ. ‘रामनाथी आश्रम हा सेवा, नियोजन आणि व्यवस्था या सर्व गोष्टींमध्ये परिपूर्ण आहे.’
१३. श्री. योगेश हनुमंत भोकरे, धुळे
अ. ‘रामनाथी आश्रमात मी अतिशय चैतन्यमय आणि प्रसन्न वातावरण अनुभवले.
आ. ‘नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा कशा प्रकारे कार्य करते’, हे मला समजले.
इ. आश्रमातील सर्व साधक सेवाभावाने कार्य करत असल्याने कुठेही कशाचीच न्यूनता वाटली नाही.’
१४. श्री. शरद प्रभाकर कुलकर्णी (जनसंपर्क अधिकारी, श्री मंगळग्रह सेवा संस्था), अमळनेर, जिल्हा जळगाव.
अ. ‘आश्रम पाहून फारच आनंद झाला. मन प्रसन्न झाले आणि ‘आश्रमाला पुनःपुन्हा भेट द्यावी’, असे वाटते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १७.६.२०२३)
|