भारत हिंद महासागरात आयोजित करणार सर्वांत मोठा युद्ध सराव !

५० देशांच्या नौदलाचा असणार समावेश !

नवी देहली – भारताच्या नौदलाकडून हिंदी महासागरामध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा युद्ध सराव आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दक्षिण कोरिया यांसह ५० देशांच्या नौदलांचा समावेश असेल.

सौजन्य : टाइम्स नाऊ नवभारत 

२० देश युद्धनौकांसह सहभागी होतील. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी हा युद्ध सराव आयोजित करण्याचा भारताचा हेतू आहे. भारतीय नौदल आय.एन्.एस्. विक्रमादित्य आणि आय.एन्.एस्. विक्रांत यांसह किमान ३० युद्धनौका यामध्ये सहभागी करणार आहे. या सरावामध्ये ‘ड्रोनच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे ?’, तसेच ‘समुद्री दरोडेखोरांच्या विरोधात कारवाई कशी करावी ?’ यांचा समावेश असणार आहे.