रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिरामध्ये आलेल्या अनुभूती

श्री. युवराज गावकर

१. शिबिरात एखादा विषय घेण्यापूर्वी ताण आल्यास प.पू. भक्तराज महाराज यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे आणि ते ‘मीच सेवा करून घेणार आहे’, असे सांगत असल्याचे जाणवणे : ‘मी शिबिरामध्ये विषय मांडतांना श्रीकृष्ण आणि प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांना शरण जाऊन विषयाची सिद्धता करतो. शिबिर चालू होण्याच्या आधी अर्धा घंटा ‘शिबिराचा विषय श्रीकृष्णाला अपेक्षित असा होईल का ? त्यात काही अडचणी येणार नाहीत ना ?’, अशा प्रकारचे विचार येऊन मला ताण येतो. त्या वेळी लगेच मला बाजूला प.पू. बाबा झोपाळ्यावर भावावस्थेत बसलेले दिसायचे. जणू काही ते मला सांगत आहेत, ‘विषय घेण्याची सेवा तुझ्या माध्यमातून मीच करणार. तू केवळ माध्यम हो.’ तेव्हा मी शांत होऊन माझी सेवा एकाग्रतेने आणि भावपूर्ण व्हायची.

२. समाजात सत्संग घेतांना ‘मी ज्या आसंदीवर (खुर्चीवर) बसलो आहे, तेथे श्रीकृष्णच बसला आहे’, असे मला स्पष्ट दिसते.

‘आपले घर आश्रम होऊन त्यात आश्रमातील चैतन्य निर्माण होण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’, हीच गुरुचरणी प्रार्थना आहे.’

– गुरुसेवक, श्री. युवराज गावकर, डिचोली, गोवा. (ऑगस्ट २०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक