Shivpal Yadav : (म्हणे) ‘कारसेवकांवर वर्ष १९९० मध्ये गोळीबार करणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक होते !’ – मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव

समाजवादी पक्षाने नेते आणि मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांचे विधान !

मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येत वर्ष १९९० मध्ये श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनाच्या वेळी कारसेवकांवर तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी केलेला गोळीबार योग्य होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गोळीबार करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते, अशा शब्दांत समाजवादी पक्षाने नेते आणि मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी गोळीबाराचे समर्थन केले.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमान एखाद्या मंदिराची तोडफोड करत असते, तर समाजवादी पक्षाने त्यांच्यावर गोळीबार केला असता का ?
  • धर्मांध मुसलमान मशिदीच्या ठिकाणी आलेल्या हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करतात, तेव्हा सत्तेवर असणारा तथाकथित निधर्मीवादी पक्ष कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कधी गोळीबार करतो का ? कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी केवळ हिंदूंनाच उत्तरदायी ठरवले जाते, हे लक्षात घ्या !