पुणे – प्रभु श्रीराम यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी रामभक्तांनी ‘गांधी भवन’ येथे ठिय्या आंदोलन केले. त्याविषयीचे निवेदन आंदोलकांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात देऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. या वेळी रामभक्त सर्वश्री पवन पिनाटे, हेमंत गायकवाड, आदर्श जैन, विशाल गुंजाळ, हर्ष भालके आदी उपस्थित होते.
‘राजकारणामध्ये देव आणल्याने देवाचे देवपण धोक्यात येते. पक्षांसह देवाच्या चारित्र्याची चर्चा होते. बिन शिखराच्या मंदिराचे उद्घाटन करणे, हे हिंदु धर्मशास्त्रामध्ये बसत नसेल, तर भाजपकडून हिंदु धर्माचे अवमूल्यन केले जात नाही का ? भाजपकडून केवळ निवडणुकांसाठी ‘श्रीरामा’चा वापर केला जातो’, अशी विधाने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली होती. (तोंड आहे म्हणून बोलणारे कुमार सप्तर्षी ! ‘देवाचे देवपण धोक्यात येते’ म्हणणार्या सप्तर्षींनी देवाला अनुभवण्यासाठी साधना केली आहे का ? – संपादक)