१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आशीर्वाद दिल्यामुळे ‘हर्निया’चे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडणे
‘सप्टेंबर २०१९ मध्ये मला आंत्रगळाचा (‘हर्निया’चा) त्रास होत होता. त्याचे शस्त्रकर्म पुणे येथील नवले रुग्णालयात होणार होते. शस्त्रकर्म होण्याच्या आदल्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील आमच्या निवासस्थानी आल्या होत्या. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘सर्व व्यवस्थित होईल. काही काळजी करू नका.’’ त्यांनी मला धीर आणि आशीर्वाद दिल्यामुळे माझे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडले.
२. मूत्रमार्गातील संसर्गाचा पुष्कळ त्रास झाल्यामुळे निराशा येणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी धीर दिल्यामुळे औषधोपचार केल्यावर लवकर बरे बाटणे
मला मूत्रमार्गातील संसर्गाचा (‘युरीन इन्फेक्शन’चा) पुष्कळ त्रास होत होता. माझ्या पोटात असह्य वेदना होत असत. मला पुष्कळ अशक्तपणा आला होता. त्यामुळे मला निराशा येऊन माझी चीडचीड व्हायची आणि स्वतःला इजा करण्याचे विचारही मनात यायचे. त्याच कालावधीत, म्हणजे १.२.२०२३ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ देवद (पनवेल) येथील आमच्या निवासस्थानी मला भेटायला आल्या. त्यांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि मला म्हणाल्या, ‘‘काही होणार नाही. तुम्ही बर्या होऊन पुष्कळ साधना करणार आहात !’’ त्यानंतर लगेचच माझ्यावर पनवेल जवळील एम्.जी.एम्. रुग्णालयात माझी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानुसार माझ्यावर औषधोपचार करण्यात आले आणि मला बरे वाटले.
केवळ गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामुळे माझी आजारपणातून लवकर सुटका झाली, त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. अंजली बाळासाहेब विभूते (वय ६० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |