Nagpur Ganja Arrest:ट्रकमधून ५०० किलो अवैध गांजाची तस्करी करणार्‍या २ धर्मांधांना  नागपूर येथे अटक !

६९ लाख ७६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर – ट्रकच्या कंटेनरमध्ये वेगळा कप्पा करून त्यामधून छुप्या पद्धतीने ५०० किलो अवैध गांजाची तस्करी करणारे शब्बीर खान (वय ३० वर्षे) आणि मुनव्वर खान (वय २८ वर्षे) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६९ लाख ७६ सहस्र रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाचे मूल्य ४९ लाख ५६ सहस्र रुपये इतके आहे. ११ जानेवारीच्या रात्री हा प्रकार घडला. गाडी मालक हाफीज जुमे खान आणि इतर एक आरोपी फरार आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रत्येक वेळी धर्मांधच गुन्हेगारीत पुढे असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

ट्रकमध्ये प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये काहीतरी लपून ठेवल्याचे पोलिसांना दिसले. नंतर त्यात गांजा आढळून आला. हा गांजा विशाखापट्टणम्हून बिहारकडे नेण्यात येत होता.

संपादकीय भूमिका

आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !