
रांची (झारखंड) – येथील बरियातू भागातील राम-जानकी मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरांतील मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. हिंदूंनी रस्ता बंद करून आंदोलन केले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. घटनास्थळी भाजपचे खासदार संजय सेठ, आमदार सी.पी. सिंह आणि आमदार समरी लाल पोचले होते. खासदार संजय सेठ म्हणाले की, अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही हे षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही.
(सौजन्य : Prabhat Khabar)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाअयोध्येत श्रीराममंदिर बांधले जात असले, तरी देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे ! |
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ