अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्रात उल्लेख
रायपूर (छत्तीसगड) – ऑनलाईन सट्टा चालवणार्या ‘महादेव अॅप’च्या प्रकरणी अटक करण्यात आलेला असीम दास याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे. यात दास याने राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना अॅपच्या मालकाने ५०८ कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे. बघेल यांच्याखेरीज शुभम सोनी, अमित कुमार अग्रवाल, रोहित गुलाटी, भीम सिंह आणि असीम दास यांची नावे आरोपपत्रात समाविष्ट आहेत. दास याच्या घरातून ५ कोटी ३९ लाख रुपये जप्त करून त्याला अटक करण्यात आली होती.