Rajapur Akshata Yatra:७ जानेवारीला राजापूर येथे श्रीराम मंगल अक्षता कलश भव्य यात्रा !

राजापूर – येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने रविवार, ७ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता भव्य कलश यात्रा राजापूर शहरात आयोजित करण्यात आली आहे.

२२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथील भव्य श्रीराममंदिरातील श्रीराम बालमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी अयोध्येवरून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलश यात्रा सकाळी ९:३० वाजता राजापूरची ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथून प्रारंभ होणार आहे. या मंगल अक्षता कलश यात्रेत राजापूर तालुक्यातील बहुसंख्य हिंदु बंधू-भगिनी यांनी पारंपरिक मंगल वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदु समाज राजापूर तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत या कलशातील पवित्र अक्षता येथील प्रत्येकाच्या घरी दिल्या जाणार असून ‘श्रीरामदर्शनाला यावे’, असे निमंत्रण देण्यात येणार आहे.