‘५.१.२०२४ या दिवशी काही साधकांना आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आपण पाहिली. आज त्या पुढिल सूत्रे पाहूया.
७. होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा.
७ अ. सेवांचे नियोजन करून सेवा केल्यामुळे ताण न्यून होणे : ‘पूर्वी आधुनिक वैद्य मराठेकाकांना ‘मला अनेक सेवा करायच्या आहेत आणि काही सेवा प्रलंबित आहेत’, या गोष्टीचा ताण येत असे. आता काका सेवेचे प्रयत्नपूर्वक नियोजन आणि वर्गीकरण करून सेवा करतात. त्यामुळे ते आनंदाने आणि तणावविरहित सेवा करतात.
७ आ. सत्संगात स्वतःच्या अडचणी मांडणे आणि साधकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय काढणे : वैद्यकीय सेवेशी संबंधित साधकांच्या सत्संगात काका त्यांच्या सेवा आणि साधना यांतील अडचणी मांडतात. ते सहसाधकांकडून उपाय जाणून घेऊन तसे प्रयत्न करतात. आता त्यांचे हे प्रयत्न वाढले आहेत. त्यामुळे सहसाधकही काकांकडे मोकळेपणाने त्यांच्या अडचणी मांडत आहेत आणि काका त्यांच्या अडचणी सोडवत आहेत.
७ इ. चिडचिड न्यून होणे : काही मासांपूर्वी काकांची विविध सेवा करतांना किंवा काही अडचणी आल्यावर चिडचिड होत असे. काकांना सहसाधकांकडून अपेक्षा असायच्या; पण या २ मासांत काकांमधे पालट जाणवत आहे. त्यांच्या सहसाधकांकडून असलेल्या अपेक्षा उणावून ‘मी काय करू शकतो ?’, असे प्रयत्न वाढले आहेत.
७ ई. स्वतःला पालटण्याची तळमळ वाढणे : काका नियमित फलकावर चूक लिहितात आणि प्रायश्चित्तही घेतात. सहसाधकांना स्वतःच्या चुका विचारतात. काका वयाने मोठे असूनही लहान वयाच्या सहसाधकांना स्वतःच्या चुका विचारतात आणि क्षमायाचना करतात. ‘काकांची स्वतःला पाटलटण्याची तळमळ वाढली आहे’, असे मला जाणवते.
७ उ. आता मराठेकाकांचा चेहरा आनंदी दिसून ते सहजस्थितीत असतात.
७ ऊ. आता काकांच्या सहवासात हलकेपणा जाणवतो.
८. सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
८ अ. आजारपणाची लक्षणे सांगितल्यावर आजार बरा होणे : ‘आधुनिक वैद्य मराठेकाका यांच्या कानावर आजारपणाची लक्षणे घातली, तरी मला बरे वाटते’; म्हणून मी जरी बाहेरच्या किंवा अन्य वैद्यांकडून तपासून घेतले असेल, तरी ‘त्यांनी काय सांगितले ?’, हे मी मराठेकांना सांगते. त्यामुळे मी आणि कुटुंबीय यांचे आजारपण दूर झाल्याची मला नेहमी अनुभूती येते; म्हणून मला त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.’ (७.३.२०२३)