चीनचे माजी नौदलप्रमुख डोंग जून चीनचे नवे संरक्षणमंत्री !

बीजिंग (चीन) – चीनच्या माजी नौदलप्रमुखांची देशाच्या संरक्षणमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता डोंग जून हे चीनचे संरक्षणमंत्री असतील. माजी संरक्षणमंत्री ली शांगफू हे गेल्या ३ महिन्यांपासून बेपत्ता असल्याने तेव्हापासून संरक्षणमंत्रीपद रिक्त होते. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार शांगफू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. शस्त्रास्त्र खरेदीशी संबंधित प्रकरणांमध्ये शांगफू चौकशीला सामोरे जात होते.

सौजन्य सीनए 

१. तैवान आणि दक्षिण चीन समुद्र यांच्याशी संबंधित सूत्रांवर तणाव अल्प करण्यासाठी अमेरिकी सैन्यासमवेत एकत्र काम करणे, हे चीनच्या संरक्षणमंत्र्यांसमोरील महत्त्वाचे दायित्व असेल.

२. वर्ष २०२१ मध्ये चीनचे नौदलप्रमुख बनण्याआधी डोंग जून ‘ईस्टर्न कमांड’चे नेतृत्व करत होते. तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण करण्याचे दायित्व याच कमांडकडे आहे.

३. जून हे ‘सदर्न कमांड’चे प्रमुखही राहिले आहेत. ही कमांड सर्वांत विवादित सागरी क्षेत्र ‘दक्षिण चीन समुद्र’चे दायित्व सांभाळते. येथे चीनचे फिलिपाईन्ससह अनेक देशांशी वाद आहेत आणि सध्या अमेरिकेच्या युद्धनौकाही येथे आहेत.