गुरुदेवांच्या कृपेमुळे साधिकेच्या मुलीचे अनिष्ट शक्तींच्या त्रासापासून रक्षण झाल्याने तिचे यजमान आणि मुलगा तिला साधनेत साहाय्य करू लागणे

१. दळणवळण बंदीच्या काळात मुलीला अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास होणे

सौ. संगीता डाफळे

‘कोरोना विषाणूच्या साथीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली होती. तेव्हा माझी मुलगी सौ. तेजश्री शिवदत्त पोवार हिच्यावर अनिष्ट शक्तींचे पुष्कळ मोठे आक्रमण झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने मी घरीच तिच्यावर नामजपादी उपाय करत होते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने मुलाच्या साहाय्याने मुलीवर नामजपादी उपाय आणि प्रार्थना करणे

त्या वेळी माझे यजमान फारशी साधना करत नव्हते. त्यांचा मलाही साधना करण्यास विरोध होता; पण त्या वेळी माझा मुलगा आणि मी तेजश्री (मुलगी) बरी होण्यासाठी सतत नामजपादी उपाय अन् प.पू. भक्तराज महाराज यांचा धावा करायचो. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला ‘कोणाकडे जायचे ? कोणाला भेटून आणखी उपाय करायचे ?’, हे सूक्ष्मातून सतत सुचवायचे. मी यजमानांना घेऊन मंदिरात जायचे आणि इतरही उपाय करायचे.

३. मुलीवर नामजपादी उपाय करत असतांना यजमान आणि मुलगा यांना परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे तिचे रक्षण झाल्याची जाणीव होणे

एकदा एका उन्नतांनी आम्हाला तिची दृष्ट काढायला सांगितली. माझी मुलगी अभियंता (इंजिनीयर) असल्यामुळे पुण्यात नोकरी करत होती. तिथेच तिला हा त्रास चालू झाला होता. माझा मुलगा आणि माझे यजमान यांनी पाहिले अन् अनुभवले की, तिला त्रास झाला की, मी परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा आणि प्रार्थना करायचे. मुलीची दृष्ट काढतांना ती बेशुद्ध पडली. तेव्हा घरात मी, माझा मुलगा, यजमान आणि मुलगी, असे चौघेच होतो. त्या वेळी त्यांना समजले, ‘अनिष्ट शक्तींचा त्रास कसा असतो आणि परात्पर गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मुलीचे त्रासापासून रक्षण कसे झाले ?’

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे यजमान आणि मुलगा साधनेत साहाय्य करू लागणे

त्यानंतर माझे यजमान आणि मुलगा यांनी माझ्या साधनेला कधीच विरोध केला नाही. आता ते स्वतः मला सेवा करायला पाठवतात. कधी कधी सेवा म्हणून ते स्वतः मला सेवेच्या ठिकाणी सोडायला आणि न्यायला येतात. हे केवळ आणि केवळ गुरुदेवांमुळेच शक्य झाले आहे. माझ्या मुलाचीही परम पूज्य गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) अढळ श्रद्धा आहे. हे केवळ आणि केवळ गुरुकृपेनेच होत आहे. जन्म दिलेली आई करणार नाही, एवढे गुरुमाऊलींनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी केले आहे अन् करत आहेत. ‘माझ्या कुटुंबाला त्यांनीच अखंड साधनेत ठेवावे’, अशी त्यांच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– सौ. संगीता डाफळे, सातारा (२२.२.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.