‘१.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक’ प्रसिद्ध झाला. यातील पृष्ठ क्रमांक १ वर सप्तर्षींच्या आज्ञेने प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे बनवलेले छायाचित्र छापून आले आहे. मी हा अंक हातात घेतल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. मी विशेषांक वाचण्यासाठी हातात घेतल्यावर ‘जणू काही सूर्यदेवाची प्रतिमा पहात आहे’, असे मला वाटले.
२. ‘परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रात मागे दिसणार्या गोलातून बाहेर पडणारा प्रकाश हा आकाशातून बाहेर पडत आहे’, असे मला जाणवत होते. त्या चैतन्याने माझे डोळे दिपून गेले. तेव्हा माझे ध्यान लागले.
३. ‘विशेषांक हातातून खाली ठेवूच नये’, असे मला वाटत होते.
४. छायाचित्रात गुरुदेवांच्या मागच्या बाजूला दिसणार्या प्रकाशाकडे पाहून आधी आलेल्या अनुभूतीविषयी उलगडा होऊन भाव जागृत होणे : मागील २ – ३ मासांमध्ये सकाळी १० ते १०.३० या वेळात माझे लक्ष सूर्याकडे गेल्यावर मला सूर्याचा गोळा पांढरा दिसत असे आणि त्यानंतर आजूबाजूला निळा रंग दिसत असे. तेव्हा ‘मला असे का दिसत आहे ?’, हे माझ्या लक्षात यायचे नाही. ‘कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक’ पाहिल्यावर गुरुदेवांच्या मागेही तसाच प्रकाश दिसल्यावर ‘मला असे का दिसत होते ?’, याचे कारण माझ्या लक्षात आले आणि माझा भाव जागृत झाला. मला आनंद जाणवत होता.’
– श्रीमती शोभा चांदणे, सनातन आश्रम, मिरज, सांगली. (३.८.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |