….अशी आजच्या भारतीय संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्षांची शोचनीय अवस्था आहे. ‘पंतप्रधान मोदींच्या विजयाच्या भयगंडाने सैरभैर झालेल्या विरोधी पक्षांना त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आयत्या चालून आलेल्या संधींचीही माती त्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे होत आहे’, हेही समजण्याइतपत भान आता उरलेले नाही. ‘आपले वर्तन आज क्षणभरात जागतिक स्तरावर पोचते आणि त्यावर जनता तिचे मत लगेचच व्यक्त करते अन् त्यातून आपणच आपली वाट काट्याकुट्यांनी भरलेली करून घेत आहोत’, हे समजण्याची बौद्धिक क्षमता विरोधी पक्ष गमावून बसले आहेत. हे संसदेच्या बाहेर आंदोलन करतांना विरोधी पक्षांनी केलेल्या वर्तनातून दिसून येते. मोदींचा विरोधक असलेल्या आणि अजूनही बुद्धी शाबूत असलेल्या कथित पुरोगामी वर्गाला विरोधी पक्षांच्या या हास्यास्पद वर्तनातून तोंड काळे करायलाही जागा उरलेली नाही, असे आता वाटत असेल. मोदींच्या विरोधात उभे रहायचे असेल, तर या जुनाट, पुरोगामी आणि बुद्धीवादी म्हणवणार्या काँग्रेस आदी पक्षांकडून कोणतीही अपेक्षा करणे, म्हणजे अरण्यरूदन करणे होय. मोदींची प्रतिमा डागाळण्याच्या नादात विरोधी पक्ष स्वतःचीच थडगी बांधत आहेत. उपराष्ट्रपतींची नक्कल करण्याच्या विरोधी पक्षांच्या कृतीतून ते इतके वैफल्यग्रस्त झाले असल्याचे दिसते की, त्यांनी मानसिकदृष्ट्या वर्ष २०२४ ची निवडणूक आताच गमावली आहे, हे अधोरेखित होते. कुठे देशातील संपूर्ण वातावरण विरोधात गेले असतांना आणि राजकीय आयुष्य जवळजवळ संपलेले असतांना एकटीच्या बळावर पुन्हा देशाची सत्ता हस्तगत करणार्या इंदिरा गांधी अन् कुठे ‘काय कधी करावे ?’, याचेही भान न उरलेले सध्याचे विरोधी पक्ष !’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१२.२०२३)