बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीत पूजापाठ करण्याच्या याचिकेवर होणार सुनावणी

नीलकंठ मंदिर उद्ध्वस्त करून बांधले होती मशीद !

लक्ष्मणपुरी – ऑगस्ट २०२२ मध्ये हिंदु महासभेचे प्रदेश संयोजक मुकेश पटेल यांनी जामा मशीद शम्स या मशिदीत पूजापाठ करू देण्यात यावे आणि या मशिदीचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात यावे, या मागण्यांसाठी याचिका प्रविष्ट केली होती. जामा मशीद शम्सी येथे पूर्वी नीलकंठ मंदिर होते. कुतुबुद्दीन ऐबक याचा जावई   इल्तुतमिश याने मंदिर पाडून तेथे मशीद बांधली, असे पटेल यांनी याचिकेत म्हटले होते. यामुळे या मशिदीत पूजापाठ करण्याची मागणी त्यांनी केली होती. मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे अनेक पुरावे हिंदु महासभेने न्यायालयात सादर केले आहेत. या प्रकरणात ६ जानेवारी २०२४ या दिवशी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी जामा मशिदीच्या बाजूने ‘जामा मशीद इंतजामिया कमेटी’, जिल्हा प्रशासन, वक्फ बोर्ड, पुरातत्व विभाग यांनी त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर मांडले आहे. जामा मशीद शम्सीच्या व्यवस्थापनाने ही याचिका रहित करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका 

भारतात बहुतांश मशिदी या मंदिरे पाडून बांधण्यात आल्या आहेत. हिंदू वैध मार्गाने ही मंदिरे परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने याची नोंद घेऊन भारतातील अशा सर्वच मंदिरांची सूची करून ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !