‘कोरोना महामारीच्या काळापासून सनातन संस्थेतर्फे ऑनलाईन सत्संग घेतले जात होते. ते सद़्गुरु नंदकुमार जाधव आणि सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३९ वर्षे) हे दोघे घेत होते.
१. सत्संग पहातांना ‘सत्संगाच्या मागच्या बाजूला महिरपी कंसाच्या आकारात काहीसे तरंग अथवा लाटा वहात आहेत’, असे मला जाणवले.
२. ‘मागील बाजूला आकाशतत्त्व जागृत झाले आहे. तिथे काहीतरी हालचाली चालू आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी मला आकाशात पाहिल्यासारखे वाटत होते. श्रीकृष्णाचे चित्र पुष्कळ प्रमाणात मोठे झाले आहे आणि त्या मानाने सद़्गुरु नंदकुमार जाधवकाका अन् सौ. क्षिप्राताई मला लहान दिसत होत्या.
३. एकदा मी एका प्रसंगामुळे दुखावले गेले होते. त्या वेळी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप करतांना माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. तेव्हा ‘पडद्यावरील (स्क्रीनवरील) श्रीकृष्ण माझ्या डोळ्यांत वाकून बघत आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मला पुष्कळ छान वाटत होते आणि नंतर माझे मन शांत झाले.
या अनुभूती दिल्याबद्दल भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म कृपाळू गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. नेहा विनायक पावसकर, मुंबई (१६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |