न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्ये १४ डिसेंबरच्या रात्री उशिरा अचानक विद्युत् पुरवठा खंडित झाला. शहरातील ब्रुकलिन भागात असलेल्या ‘कोन एडिसन पावर प्लांट’मध्ये बिघाड झाल्याने जवळपास २० मिनिटे शहरात विद्युत् पुरवठा बंद होता. यामुळे अनेक ठिकाणी लोक ‘लिफ्ट’मध्ये अडकून पडले होते. एकूणच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सौजन्य CBS New York
वीज प्रकल्पातून काळा धूर येत असल्याचे समोर आले. यामुळे रस्ते आणि गल्ल्या येथील दिवेही बंद झाले. वीज प्रकल्पाच्या ठिकाणी स्फोट झाल्यामुळे हे घडल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. शहरातील डाऊनटाऊन ब्रुकलिन, बेड स्टू, लोअर मॅनहॅटन, अपर ईस्ट साइड आणि लॉन्ग आयलँड सिटी आदी भाग अंधारात बुडाले होते.