इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टांक जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयावर आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती आक्रमणात ३ पोलीस ठार झाले, तर २ जण घायाळ झाले. या वेळी झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले. १२ डिसेंबर या दिवशी डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील सैन्यतळावरही आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. त्यात २३ सैनिक ठार झाले होते. आतंकवाद्यांनी या तळावर स्फोटके भरलेली गाडी धडकवली होती. त्यानंतर झालेल्या स्फोटात सैनिक ठार झाले.
सौजन्य dawn news