‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमध्ये अनेक साधक आणि सनातनचे संत यांच्या संदर्भातील भरपूर अनुभूती असण्यामागील कारणे

‘बहुतेक नियतकालिकांत केवळ प्रमुख संतांबद्दल अनुभूती असतात; मात्र ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमध्ये अनेक साधक, तसेच सनातनचे अनेक संत यांच्या संदर्भातीलही भरपूर अनुभूती असतात. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. प्रमुख संतांबद्दल अनुभूती वाचून वाचकांची केवळ त्या प्रमुखांविषयी श्रद्धा निर्माण होते आणि त्यातून व्यक्तीनिष्ठता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ईश्वरीतत्त्वाविषयी श्रद्धा निर्माण होण्यात अडथळा येतो.

२. अनुभूती या साधकातील भावामुळे येतात. विविध साधक आणि संत यांच्या अनुभूतींतून ‘प्रत्येकाचा भाव कसा असतो ?’, हे शिकता येते आणि वाचकांना त्यांच्या साधनामार्गात भाव आणि ईश्वराप्रती श्रद्धा निर्माण होण्यास साहाय्य होते.

३. केवळ प्रमुख संतांच्या अनुभूतीतून शिकल्यास वाचकांमध्ये केवळ त्या संतांकडून शिकणे होते. शिकणे ही प्रक्रिया अविरतपणे आणि कुणाकडूनही होऊ शकते, हे लक्षात येण्यासाठी ‘सर्वांच्या अनुभूतीतून कसे शिकायचे ?’, हे देव दाखवून देतो.

४. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती…’, या न्यायानुसार साधकांना अनेक प्रकारच्या अनुभूती येत असतात. संबंधित साधकाच्या अनुभूती वाचून वाचकांनाही तशा अनुभूती आल्या असल्यास तो साधक त्यांना जवळचा वाटतो आणि एखाद्याला न भेटताही त्याच्याशी जवळीक निर्माण होते. अशा प्रकारे वाचकांमध्ये व्यापकत्व निर्माण होते.

यासंदर्भात कुणाला काही प्रश्न असल्यास, ते विचारू शकतात. –

नाव : सौ. भाग्यश्री सावंत

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१