१. रामनाथी आश्रमातून मुलीसमवेत दुचाकीने घरी जातांना कुत्र्याने पाठलाग करणे
‘अनुमाने ४ मासांपूर्वी मी आणि माझी मुलगी सौ. विद्या विनायक शानभाग रामनाथी आश्रमातून रात्री १० वाजता दुचाकीने घरी जात होतो. त्या वेळी माझा मनामध्ये श्री दुर्गादेवीचा जप चालू होता. अर्धा रस्ता पार केल्यावर एक कुत्रा आम्हाला पाहून आमचा पाठलाग करू लागला. मी दुचाकीवर सौ. विद्याच्या मागे बसले होते. तो जोरात भुंकत माझ्याकडे येऊ लागला.
२. कुत्र्याने दुचाकीच्या वेगाने पाठलाग करणे आणि साधिकेने न घाबरता ‘जय गुरुदेव’ असा जयघोष करणे
कुत्र्याला पाहून मी ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव’, असा जयघोष जोरात करू लागले. कुत्रा येत असल्याचे सौ. विद्याला समजले आणि ती अधिक वेगाने वाहन चालवू लागली. त्या वेळी तो कुत्राही वेगाने पळत अगदी माझ्या पायाशी येऊन भुंकू लागला. त्याचा वेग दुचाकी वाहनाइतकाच असल्याने ‘तो माझ्याजवळच आहे’, असे मला वाटत होते. मी न घाबरता आणि वाहन पकडलेला हात न सोडता जोरात ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव’ असे म्हणत होते. (तो कुत्रा आमचा १०० पावलांपर्यंत पाठलाग करत होता.) मी कुत्र्याकडे उघड्या डोळ्यांनी पहात होते. तो कुत्रासुद्धा माझ्याकडे बघत भुंकत धावत होता आणि माझ्या पायाचा चावा घेऊ शकेल, इतक्या अंतरावर होता.
३. गुरुदेवांचा जयघोष केल्यामुळेच साधिकेभोवती संरक्षककवच निर्माण होऊन कुत्रा मागे फिरणे आणि आपत्काळातही गुरुदेवच साधकांचे रक्षण करणार असल्याची निश्चिती होणे
श्रीविष्णुरूपी गुरुदेवांच्या म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जयघोषामुळेच माझे त्या कुत्र्यापासून रक्षण झाले. कुत्र्याचे तोंड माझ्या साडीला लागत होते; परंतु कुत्रा मला चावला नाही. गुरुदेवांच्या जयघोषाने माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण झाले. थोड्या वेळाने कुत्रा मागे फिरला. माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते. ‘जय गुरुदेव’ असा जयघोष करत आम्ही घरी पोचलो. ‘आपत्काळात केवळ श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेच आम्हा साधकांचे रक्षण करणार आहेत’, याची निश्चिती येऊन माझ्याकडून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली. जय गुरुदेव !’
– श्रीमती मीरा करी, (६४ टक्के आध्यात्मिक पातळी) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |