भोपाळ – बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ई-मेल पाठवून पंडित धीरेंद्रकृष्ण त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी छतरपूर जिल्ह्यातील बमिठा पोलिसांनी बिहारमधील पाटणा येथून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जिवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल ऑक्टोबर महिन्यात मिळाला होता. आरोपींनी ‘तुम्हाला प्राण वाचवायचे असतील, तर एका दिवसात आम्हाला १० लाख रुपये द्या’, अशी धमकी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना दिली होती. अशाच प्रकारची धमकी त्यांना १० महिन्यांपूर्वीही मिळाली होती.